जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या विद्यार्थिनींची अभियंता पदी निवड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  स्पर्धा परीक्षा म्हटलं की सर्वसामान्य माणसांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात.पण सुरुवातीला अनेक परीक्षेत येणारे अपयश,त्यासाठी लागणारा खर्च त्यामुळे अनेक अडचणींचे प्रसंग निर्माण झाले.मात्र आई-वडिलांच्या कष्टाची स्वाती नामदेव होन हीने निष्ठेने अभ्यास केला असून त्यामुळेच तिची सार्वजनिक बांधकाम विभाग येथे सहाय्यक स्थापत्य अभियंता पदासाठी निवड झाली आहे.तिच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  

“स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नीट समजून घेत वेळेचे नियोजन करत आठ ते दहा तास अभ्यास करण्याची तयारी ठेवली तर यश हमखास मिळू शकते.माझ्या यशामध्ये माझे आई-वडील तसेच माझ्या गुरूंचा मोठा वाटा आहे”-स्वाती होन.

कु.स्वाती नामदेव होन ही सर्वसामान्य कुटुंबातील लेक.कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावची मूळ रहिवासी.सर्वसामान्य कुटुंबातून असल्याने व्यवस्थेच्या निम्नस्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत विविध कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा संघर्ष स्वातीने जवळून पाहिला आहे.यामुळेच तिला अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावत राहिले.स्वाती हिचे राधाबाई काळे विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले.पुढे तिने एस.एस.जी.एम. महाविद्यालयात उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण घेतले.नंतर संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून सिव्हिल इंजिनिअर पदवी मिळवली होती.शिक्षणाची आणि अभ्यासाची आवड असल्याने स्वातीला खाजगी कंपनीत नोकरीची संधी मिळत होती.पण स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अधिकारी पद पटकावून समाजसेवेचा संकल्प केला.याच समाजाची सेवा करण्याचे स्वप्न तिने स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून पाहिले.कोरोनाच्या काळात नाशिक सोडून कोपरगाव येथे घरी अभ्यास केला.ऑगस्ट २०२३ मध्ये एम.पी.एस.सी.मधून
झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत तिने सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट हे पद मिळवत यशाला गवसनी घातली आहे.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना स्वातीला सोलापूर गुप्तचर विभागाचे पोलीस आयुक्त नागेश गायकवाड,उप पोलीस निरीक्षक मृणाल पवार,तलाठी राहुल सोनवणे,प्रवीण खंडिझोड,आत्मा मलिक करिअर अकादमीचे पंकज माळी यांचे मार्गदर्शन लाभले.यानिवडीबद्दल आ.आशुतोष काळे,माजी आ.अशोक काळे,संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे,विवेक कोल्हे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close