धार्मिक
कोपरगावात संगीतमय शिव महापुराण प्रारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या कर्मवीर नगर येथील साई मंदिराच्या आठव्या वर्धापन दिना निमित्त श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या साध्वी कृष्णांनंदगिरी महाराज यांच्या सुस्राव्य वाणीतून संगीतमय शिव महापुराण सप्ताह आयोजित केला असून त्याचा शुभारंभ महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला असल्याची माहिती आयोजक साई अष्टविनायक मंडळ व साई मंदिर समिती आदींनी दिली आहे.
साई मंदिराच्या आठव्या वर्धापन दिना निमित्त श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या साध्वी कृष्णांनंदगिरी महाराज यांच्या समवेत महिला भाविक दिसत आहे.
शिव पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत,ज्यात भगवान शिवाच्या लीला आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे.तुम्ही शुभ मुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता.पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी मानले जाते.चंचला आणि तिचा पती बिंदुगा यांची कथा शिवपुराणात आढळते,ज्यांना शिवपुराण ऐकून शिवलोकात स्थान मिळाले.शिवपुराणाच्या महत्त्वाचे वर्णनही याच कथांमध्ये आढळते.कर्मवीरनगर येथे त्याचा नूकताच प्रारंभ झाला आहे.
कोपरगाव शहरातील साई अष्टविनायक मंडळ व साई मंदिर समिती विविध धार्मिक कार्याचे आयोजन करत असते यावर्षीही त्यांनी साई मंदिराच्या आठव्या वर्धापन दिना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्यात ‘संगीतमय शिव महापुराण सप्ताह’ या कार्यक्रमाचा समावेश आहे.सदर कार्यक्रम शनिवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सुरु झाला असून त्या दिवशी महिला आणि भाविक भक्तांनी सव्वाशिणींनी कलश मिरवणूक आयोजित केली होती.त्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असल्याचे दिसून आले आहे.या कार्यक्रमासाठी भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे.
त्यांचा सांगता समारंभ दि.२६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०७ वाजता भांडारा कार्यक्रमाने होणार आहे.त्याच दिवशी आलेल्या भाविकांसाठी भंडारा कार्यक्रमाचे व शिवभजन संध्या आदी कार्यक्रमाचे आयोजन कर्मवीरनगर येथे साई प्रांगणात केले आहे.त्याचा शिव भक्तांनीं लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.