जाहिरात-9423439946
निवडणूक

गणेश कारखाना निवडणूक,छाननी बाबद संशयास्पद हालचाली ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरु असून १९ जागेसाठी १०६ अर्ज आलेले असताना या अर्जाची छाननी ही उद्या २२ मे रोजी संपन्न होत आहे.सदर निवडणूक प्रक्रिया ही सहकार कायदा व पोटनियमच्या तरतुदी नुसार सुरू आहे.त्यानुसार छाननी प्रक्रिया राबविली जाणे आवश्यक असताना एका वरिष्ठ राजकीय नेत्याची व निवडणूक निर्णय अधिकारी यांची गुप्त बैठक होऊन नियमांना हरताळ फासण्याची व्यूहरचना आखली जात असल्याचा संशय साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डाॅ.गोंदकर यांनी व्यक्त केला असल्याने राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे.

“गणेश कारखाना निवडणूकीसाठी एक गोपनीय बैठक संपन्न झाली असून त्यामुळे सदर निवडणूक संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.सभासद शेतकरी यांचे विशेषतः अनुसूचित जाती व जमाती महिला प्रतिनिधी,इतर मागासवर्गीय,भटक्या विमुक्त जाती व जमाती यांना असलेला संवैधानिक हक्क डावलण्याचे हेतूने कायदा व नियम यांना धाब्यावर बसवून निवडणूकीतुन बाद करण्याचा धक्कादायक डाव एका बड्या राजकीय नेत्याकडून व अधिकाऱ्यांकडून आखला जात आहे”-डॉ.एकनाथ गोंदकर,माजी विश्वस्त,साईबाबा संस्थान शिर्डी.

राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच सहकार विभागाने जाहीर केला असून नामनिर्देशन पत्र भरण्यात दि.१५ मे पासून सुरुवात झाली असून ते भरण्याचा अखेरचा दिवस दि.१९ मे होता.यात आलेल्या अर्जाची छाननी दि.२२ मे रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दि.२३ मे ते ०६ जून २०२३ पर्यंत दुपारी ०३ वाजे पर्यंत आहेत तर निवडणूक दि.१७ जून रोजी सकाळी ०८ ते दुपारी ०५ वाजे पर्यँत संपन्न होत असताना आज धक्कादायक खबर आली आहे.त्यात गणेश कारखाना निवडणूकीसाठी एक गोपनीय बैठक संपन्न झाली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे सदर निवडणूक संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.गोर गरीब सभासद शेतकरी यांचे विशेषतः अनुसूचित जाती व जमाती महिला प्रतिनिधी,इतर मागासवर्गीय,भटक्या विमुक्त जाती व जमाती यांना असलेला संविधानिक हक्क डावलण्याचे हेतूने कायदा व नियम यांना धाब्यावर बसवून निवडणूकीतुन बाद करण्याचा डाव एका बड्या राजकीय नेत्याकडून व अधिकाऱ्यांकडून आखला जात आहे असल्याची माहिती मिळत आहे.मात्र अशी अन्यायकारक प्रकिया राबविली गेल्यास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग केला तर आम्ही आत्मदहन करण्यासही मागे पुढे बघणार नाही असा इशारा संस्थानचे माजी विश्वस्त डाॅ.एकनाथ गोंदकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”सदर कारखाना हागोर गरीब सभासदांच्या त्यागातून उभारलेला हा कारखाना ताकतीच्या जोरावर नियम डावलून कोणी लुबाडू पाहत असेल तर शेतकरी व कारखान्याचे सभासद त्यांची गय करणार नाही व त्या अधिकारी आणि दबाब टाकणाऱ्या नेत्याच्यां नावाने आत्मदहन करून निषेध व्यक्त करू अशी संतप्त भावना उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेक सभासदांची झाली असल्याचा दावा डॉ.गोंदकर यांनी शेवटी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close