जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यात १५ वर्षांनी काळे-कोल्हे-परजणे युती पुढे आव्हान,दुरंगी लढत

जाहिरात-9423439946

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


     कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १०४ पैकी ६३ उमेदवारांनी मागे घेतले असून ०३ जागा बिनविरोध झाल्या असून १५ जागेसाठी आता रिंगणात ३८ जण आपले भविष्य आजमावत असून यात शिवसेनेने आपले ०९ उमेदवार रिंगणात ठेवल्याने त्यांनी प्रस्थापित काळे-कोल्हे,परजणे-औताडे युतीला आव्हान निर्माण केले आहे त्यामुळे आता ही दुरंगी लढत तब्बल १५ वर्षांनी रंगणार असून याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रसंगी वेळ संपल्याने त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी हरकत घेतलीं त्यावेळी उडालेली झुंबड.


    कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या साखर कारखान्यांच्या निवडणूका स्थानिक नेत्यांनी सभासदांना विश्वासात न घेता बिनविरोध काढल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची अच्छि-खांशी नाराजी आहे.त्यामुळे ते या निवडणुकीत मोठ्या जोमाने उतरले होते.तर या छोट्याशा निवडणूकीत तालुक्यात विरोधकच शिल्लक न ठेवल्याने उगाच कोट्यावधीचा चुराडा करायचा हे काळे-कोल्हेना मान्य नाही अशी खात्रीलायक बातमी होती.त्यामुळे कोणत्याही स्थितीत हि निवडणूक बिनविरोध काढायची असा त्यांनी चंग बांधला असताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने त्यास सुरुंग लावला आहे.त्यामुळे आता तालुक्यात गुपचूप बिनविरोध निवडणुका घडवून आणणाऱ्या काळे-कोल्हे-परजणे गटाच्या मनसुब्याना सुरुंग लागला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव,श्रीरामपूर,राहात्यासह सर्व तालुक्यात राजकीय पक्षांनी आता आपले लक्ष बाजार समितीच्या निवडणुकीवर केंद्रीत केलेले आहे.यामुळे साहजिकच या सन-२०२३-२०२८ या कालावधीसाठी निवडणुकीतील चुरस वाढली होती.यात पारंपरिक आ.आशुतोष काळे सह माजी आ.स्नेहलता कोल्हे गट व महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे हे पारंपरिक तीन गटासह शिवसेनेच्या (?) नितीन औताडे गटास हाताशी धरून त्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आपल्या सत्तेची पोळी भाजली होती.मात्र त्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुरुंग लावला आहे.

   यात प्रामुख्याने शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,अड्.दिलीप लासुरे,शहर प्रमुख सनी वाघ,माजी शहर प्रमुख भरत मोरे,अस्लम शेख आदींनी महत्वाची भूमिका निभावली आहे.त्यामुळे आता हि निवडणूक श्रीरामपूर बाजार समिती सारखीच सत्ताधारी मंत्री राधाकृष्ण विखे,माजी आ.मुरकुटे आ.ससाणे गट,आदी तीन गटाच्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली व आ.लहू कानडे,अविनाश आदिक यांच्या सहकार्याने राजकीय लढाई रंगली आहे.

     यापूर्वी निवडणुकीत असा अनुभव आला आहे.की सत्ताधारी जेंव्हा एकत्र येतात त्या-त्यावेळी मतदार या सत्ताधारी गटास नाकारताना दिसून आले आहे.याचा अनुभव सन-२००६ च्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीस आला होता.त्यावेळी प्रस्थापित तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे एकत्र आले होते.त्यांच्या विरुद्ध साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांनी निवडणूक लढवली होती.त्यात यांना नऊ जागा प्राप्त झाल्या होत्या.व काही जागा केवळ बोटावर मोजण्या इतक्या मतांनी गमवावा लागल्या होत्या.मात्र त्यावेळी सत्ताधारी गटाची मस्ती मतदारांनी चांगलीच उतरवली होती.
   दरम्यान कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या आपले अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अपेक्षेने सेनेच्या आपल्या गटास मदत करण्याचे सोडून आपले शस्र म्यान करून शरणागतासारखे एका रांगेत येऊन आपले नामनिर्देशन अर्ज माघारीसाठी दिले असल्याचे दिसून आले आहे.व सत्ताधारी गटाला सामील होण्यात धन्यता मानली आहे.त्यासाठी सहा नामनिर्देशन अर्ज शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांनी ईशान्य गडावरील युवा भाजप (?) नेत्याला फोन करून औताडे गटास दोन जागा मिळविण्यात महत्वाची भूमिका निभावली असल्याची विश्वसनीय माहिती समजली आहे.

   दरम्यान नामनिर्देशन माघारीच्या वेळी शिवसेनेच्या उद्धव गटाने सावधानता बाळगत माघारीची वेळ संपण्याच्या वेळी दर वेळे प्रमाणे मुदत संपुनही माघार रात्री उशिरा पर्यंतची प्रथा मोडीत काढली आहे.व सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात तटबंदी करून कोणालाही जाण्यास प्रतिबंध करून त्याचे आपल्या भ्रमाणध्वनीत चलचित्रण करण्यास सुरुवात केल्याने सत्ताधारी गटाची मोठी कोंडी केली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे नामनिर्देशन मागे घेण्याच्या वेळी वेळ संपून गेल्याने काळे-कोल्हे-परजणे-औताडे गटाची मोठी कोंडी झाली असून त्यांचे अनेक अर्ज मागे घेण्याचे राहून गेले आहे.तर अनेकांची माघार घेण्याची इच्छा नसताना त्यांचा बळी दिल्याने त्यांनी जागेवरच शिवसेनेला थेट पाठिंबा देऊन या सत्ताधारी युतीला तडाखा दिला आहे.त्यामुळे अधिकारी वर्गाला त्यांना अनिच्छेने दाद द्यावी लागली आहे.त्यामुळे सत्ताधारी गटाला आपले स्वतःचे नाक कापून नमनालाच मोठा अपशकुन घडला आहे.तरीही यात समाधानाची बाब म्हणजे तीन जागा बिनविरोध निघाल्या हाच काय त्यांना भर उन्हाळ्यातील दिलासा ठरला आहे.मात्र यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी त्यांना लपवता आली नाही.ती बरेच काही सांगून जात होती.
त्यामुळे आगामी काळात आता या आघाडी समोर मोठे आव्हान निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले आहे.

   आता माघारी नंतर शिल्लक राहिलेले उमेदवार पुढील प्रमाणे-

सर्वसाधारण गट-
   लामखडे साहेबराव शिवराम,रोहोम साहेबराव किसन,पवार विष्णू नानासाहेब,चांदगुडे किरण मधुकर,पवार धनराज मनसुख,शिंदे लक्ष्मण विश्वनाथ,जाधव विजय सुधाकर,गव्हाणे रंगनाथ सोपान,देवकर शिवाजी बापूराव,आसने कैलास भीमा,शिंदे संजय माधवराव,टेके रावसाहेब चांगदेव,परजणे गोवर्धन बाबासाहेब,हेगडमल देवराम रामभाऊ,गवळी राहुल सुरेश,गोर्डे बाळासाहेब गंगाधर आदींचा समावेश आहे.

महिला राखीव मतदार संघ-
कदम मीरा सर्जेराव,बारहाते हिराबाई रावसाहेब,जावळे गयाबाई धर्मा,डांगे माधुरी विजय आदींचा समावेश आहे.

इतर मागास प्रवर्ग-
पवार गिरीधर दिनकर,फेफाळे खंडू पुंजाबा,बिडवे दत्ता नामदेव आदींचा समावेश आहे.

ग्रामपंचायत मतदार संघ-
दंडवते संजय काशिनाथ,पाडेकर विष्णू एकनाथ,निकोले राजेंद्र शंकर आदींचा समावेश आहे.

व्यापारी आडते मतदार संघ-
कोठारी सुनील गोकुळचंद,धाडीवाल ललीतकुमार तेजमल,सांगळे ऋषिकेश मोहन,भट्टड संजय शामलाल,शाह मनीष जयंतीलाल,नदीम अहमद रियाज अहमद खान,ठक्कर संतोष मंगलदास,निकम रेवणनाथ श्रीरंग आदींचा समावेश आहे.

हमाल मापाडी मतदार संघ-
शेळके जलदीप भाऊसाहेब,मरसाळे अर्जुन भगवान,साळुंके रामचंद्र नामदेव आदींचा समावेश आहे.
आता आगामी निवडणूक तारखेला नेमके काय होणार याकडे मतदार आणि राजकीय निरीक्षांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान आज निवडणूक अधिकारी तथा सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी व त्यांच्या सहकार विभागाच्या सहकाऱ्यांनी कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता चोख निवडणूक सेवा बजावली आहे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close