जाहिरात-9423439946
निवडणूक

गणेश कारखान्याचा तोटा २७ कोटीवरून १५० कोटींवर कसा गेला-…यांचा सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

गणेश सहकारी साखर कारखान्याचा तोटा २७ कोटीवरून १५० कोटींवर कसा गेला याबाबत सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यायला हवे याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी संघटना उच्च न्यायालयात गेली असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी वाकडी येथील आयोजित सभेत बोलताना केले आहे.

“प्रस्थापितांनी बाजार समित्या या शेतकऱ्यांचे कत्तलखाने बनवले आहे.सहकारी कारखाण्यांची तीच स्थिती केली असल्याचा आरोप करून उपपदार्थ निर्मितीसाठी टनामागे कपात करून शेतकऱ्यांचे खिसे कापले व स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.जिल्ह्यात विशिष्ट नेतेच का सत्तेत व व्यवस्थेत येतात याचे उत्तर शेतकऱ्यांनी शोधायला हवे”-अनिल औताडे,अध्यक्ष,शेतकरी संघटना,नगर जिल्हा.

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून याबाबत राजकीय व्यूहरचना सुरु झाली असून शेतकऱ्यांच्या गळितास गेलेल्या उसाच्या ०२ हजार ५०० रुपयांच्या पहिल्या देयकाच्या मागणीसाठी आज सकाळी दि.१५ सकाळी १० वाजता वाकडी येथील श्री खंडोबा मंदिर सभागृहात शेतकऱ्यांची शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.बैठकीचे अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर सोडनर हे होते.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,विठ्ठल शेळके,संघटक नानासाहेब गाढवे,तालुकाध्यक्ष योगेश मोरे,कामगार नेते गोपीनाथ घोरपडे,महेश लहारे,किसन कोते,शंकर लहारे,विलास कदम,प्रभाकर पानसरे,अनिल कोते आदीं मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”वर्तमान स्थितीत मतदारांची व नागरिकांची पराभूत मानसिकता झालेली असून प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी संघटना हा पर्याय उमेद जगविण्यासाठी तयार करण्यात आला आहे.या देशात कायद्याचे राज्य आहे.त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.चंगळवादी संस्कृतीत विकासाची अपेक्षा मावळली आहे.त्याचा फायदा प्रस्थापित राजकीय व्यवस्था घेत असून त्यासाठी,”फोडा आणि राज्य करा” ही इंग्रज नीती वापरली जात आहे.शेतकरी आत्महत्या या विषयावर कोणीच का बोलत नाही.येथे अन्य फिजुल विषयाला माध्यमे वेळ देत आहे.समाज माध्यमे आणि चौथा स्तंभ म्हणून मिरवणारी माध्यमे ही केवळ केराच्या टोपल्या झाल्या असल्याचा आरोप करून त्यांच्या मान्यता का ठेवायच्या असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सन-२०१७ साली राज्य सरकारने,’छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी कर्ज माफी योजना’ आणली पण ती राबवलीच गेली नाही.त्या बाबत आपण राज्य सरकारला उच्च न्यायालयात जाब विचारला आहे. त्यावेळी त्याचे गांभीर्य सरकारला जाणवले आहे.त्यांनी केवळ पंधरा दिवसात सुनावणी घेऊन त्याबाबत राज्य सरकारला राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्ज माफीचा आदेश दिला आहे.०१ हजार ८०० कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.मात्र अजूनही राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही.म्हणून अवमानना याचिका करणार असल्याचे जाहीर केले आहे.वडील स्व.बबनराव काळे यांचे शेतकऱ्यांसाठी केलेले काम आजही गावोगाव दिसत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

“लोकशाही व्यवस्थेत जनतेपर्यंत पोहचण्यासाठी निवडणुका हा उत्तम पर्याय असल्याने शेतकरी संघटना निवडणुका लढवत आहे.त्यातूनच लोकशाहीत परिवर्तन होते.म्हणुन आपण अशोक सहकारी कारखान्यानंतर श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका लढवत आहे.शेतकऱ्यास लुटणाऱ्यांना बाजूला करण्यासाठी ही संधी मानत असून त्यासाठी ही निवडणूक लढवली जात आहे”-अड्.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.

राज्यात ठराविक घराणी सत्तेत ठाण मांडून बसली असून त्यांच्या ताब्यात गणेश कारखाना ठेवला तर तो तोटा एक हजार कोटींवर जाईल.तुमच्यासाठी कोणी सत्तेत जात असतील तर ते प्रश्न सुटले का नाही,सुटले नाही तर ते सोडण्यास सक्षम नाही हे समजून शेतकऱ्यांनी त्यांना सोडचिट्ठी देण्याची वेळ आली आहे.मात्र मतदार हा पायाभूत प्रश्न समजून घेण्यास तयार नाही.त्यामुळे प्रश्न जटील होत चालला आहे.त्यात तीन वर्ष ऊस दिला नाही तर सभासदत्व जाते याचे भान वेळीच ठेवले जात नसेल तर तो लोशाहीचा आत्मघातच ठरणार आहे.ऊसाला भाव द्यायचा नाही आणि शेतकऱ्याने दुसऱ्या कारखान्यास ऊस दिल्यावर सभासदत्व घालवायचे हे शेतकऱ्याविरुद्ध मुद्दामहून चालविलेले कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.हा सरळसरळ शेतकऱ्याचा कडेलोट आहे हे व्यवस्थेच्या लक्षात आणून द्यावे लागेल.त्यावेळी तुम्हाला न्याय मिळेल.लोकशाहीतील हत्यारांचा वापर करून ही लढाई करावी लागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले असून लोकशाहित पैसा हे सर्वस्व नाही असं सांगून निवडणुका या विचारावर लढवायला हव्या.आणि भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना आपण हरवू शकतो यावर विश्वास ठेवायला हवा असे आवाहन केले आहे.त्यासाठी शेतकऱ्यांत उभे राहण्याची जिद्द निर्माण करायला हवी.निवडणुकातील,’हार’ किंवा ‘जित’असा विचार करून लढू नका तर समाजात काही चांगले तत्व स्थापन करण्यासाठी लढायाच्या आहेत असा विचार करून लढा असे उपस्थितांना आवाहन केले आहे.

बाजार समिती निवडणुका या विषयावर बोलताना ते म्हणाले की,”लोकशाही व्यवस्थेत जनतेपर्यंत पोहचण्यासाठी निवडणुका हा उत्तम पर्याय असल्याने शेतकरी संघटना निवडणुका लढवत आहे.त्यातूनच लोकशाहीत परिवर्तन होते.म्हणुन आपण अशोक सहकारी कारखान्यानंतर श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका लढवत आहे.शेतकऱ्यास लुटणाऱ्यांना बाजूला करण्यासाठी ही संधी मानत असून त्यासाठी ही लढाई लढवली जात आहे.बाजार समित्यांच्या निवडणुकांत अनामत रक्कम ५०० वरून ५००० करून शेतकऱ्यांना निवडणूका नाकारण्याचे काम सत्ताधारी करत आहे.मात्र तरीही राज्यात सर्वाधिक नामनिर्देशन पत्र दाखल होतात हि घटना नेमके काय दर्शवत आहे असा सवाल त्यांनी केला आहे.कांदा पिकाबाबद बोलताना ते म्हणाले की,”निर्यात सुरू करून आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा पाठविण्याची विनंती सरकारला केली आहे.व कांद्यास आधारभूत किंमत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

वीज प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की,”शेतकऱ्यांना वीज देताना तुम्ही देयके मागत असतील तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वीज खांब जातात त्यांनाही भरपाई मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी त्यांनी शेवटी केली आहे.

सदर प्रसंगी अनिल औताडे यांनी मार्गदर्शन करताना,”प्रस्थापितांनी बाजार समित्या या शेतकऱ्यांचे कत्तलखाने बनवले आहे.सहकारी कारखाण्यांची तीच स्थिती केली असल्याचा आरोप करून उपपदार्थ निर्मितीसाठी टनामागे कपात करून शेतकऱ्यांचे खिसे कापले व स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.जिल्ह्यात विशिष्ट नेतेच का सत्तेत व व्यवस्थेत येतात याचे उत्तर शेतकऱ्यांनी शोधायला हवे.राहुरी कारखाना यांनी जिल्हा बँक ताब्यात असताना सदर बँकेच्या घशात का घातला याचा सभासदांनी विचार करायला हवा.गणेश कारखाना यांनी ताब्यात घेऊन त्याची वाट लावली आहे.या पुढे शेतकरी संघटना सत्तेला पर्याय म्हणून पुढे येणार आहे.राज्यात शेतकरी संघटनेची मोठी ताकद असून त्यांना सत्तेत आणून द्यावे लागेल असे आवाहन सभासदांना त्यांनी शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,संघटक नानासाहेब गाढवे,गोपीनाथ घोरपडे,सुदाम औताडे,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश मोरे,आण्णासाहेब कोते,जयशिंग लहारे,किसन कोते आदींनी मार्गदर्शन केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक विठ्ठलराव शेळके यांनी केले आहे तर सूत्रसंचालन योगेश मोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेश लहारे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close