जाहिरात-9423439946
निवडणूक

”…आता आयुधे तयार ठेवा”-..या नेत्याचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांना २०१९ च्या विधानसभा निवडणुक प्रचारा वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून वचनपूर्ती केली आहे.त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपली आयुधे तयार ठेवावी असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी एका बैठकीत बोलताना केले आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.१७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील जनतेचं निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं.अखेर निवडणूक आयोगानं ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे.आता ओ.बी.सी.आरक्षणावर सर्वच पक्षांनी आक्षेप घेतला असला तरी कोपरगावसह बऱ्याच ठिकाणी अनेक पक्ष निवडणूक तयारीला लागले आहे.त्याला राष्ट्रवादीही अपवाद नाही.

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.१७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील जनतेचं निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं.अखेर निवडणूक आयोगानं ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे.आता ओ.बी.सी.आरक्षणावर सर्वच पक्षांनी आक्षेप घेतला असला तरी बऱ्याच ठिकाणी अनेक पक्ष निवडणूक तयारीला लागले आहे.त्यामुळे १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल असे गृहीत धरून राष्ट्रवादीसह अनेक पक्ष कामाला लागले आहे.याबाबत कोपरगाव शहर राष्ट्रवादीची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे.त्यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्याना हे आवाहन केले आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”अडीच वर्षापूर्वीचे कोपरगाव शहर आणि आजचे कोपरगाव शहर यात विकासाच्या बाबतीत मोठा बदल झाला आहे.शहरातील नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून मागील अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे.येत्या दोन वर्षाच्या आत कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळणार आहे.ज्या कोपरगाव शहराला धुळगाव असे संबोधले जायचे त्या कोपरगाव शहराने आपली जुनी ओळख पुसली असून विकासाच्या बाबतीत झालेला बदल भविष्यातील विकासाची नांदी ठरणार आहे.

शहरातील जनतेला आश्वासन नको होते,त्यांना विकास हवा होता.ती जबाबदारी आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे पार पाडली असून यापुढे देखील माझ्याकडून कोपरगाव शहराच्या विकासाला नेहमीच प्राधान्य राहणार आहे.अडीच वर्षाच्या काळात सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली.त्या संधीचा फायदा घेवून संपूर्ण मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटीचा निधी आणला.त्याचबरोबर कोपरगाव शहरातील नागरिकांचा विशेषत: माता-भगिनींचा जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे.शहराला दिलेल्या निधीतून नागरिकांना अपेक्षित असलेले रस्ते,आरोग्य,शहर सुशोभिकरण आदी कामे झाली आहेत.त्यामुळे शहर वासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.ज्याप्रमाणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील नागरिकांनी विश्वास दाखविला त्याप्रमाणे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत देखील सुज्ञ जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही.२०१९ ला बदल झाला तोच बदल नगरपालिका निवडणुकीत देखील होणार आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे विजय आपलाच होईल असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close