निवडणूक
कोपरगाव प्रगत सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी गिरमे तर उपाध्यक्षपदी सौ.बोरावके
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कामधेनु समजल्या जाणाऱ्या कोपरगाव प्रगत शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी वैभव सूर्यभान गिरमे यांची तर उपाध्यक्ष जयश्री अनिल बोरावके यांची निवड झाली असून नूतन पदाधीकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव प्रगत शेतकरी सेवा संस्थेचे नूतन अध्यक्ष हे सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असून त्यांची निवड ही सार्थ समजली जात आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव सहकार विभागाने नुकतीच कोपरगाव प्रगत शेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पाडली असून यात तेरा संचालकांची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून त्यात अनिल प्रभाकर बोरावके,सूर्यभान तुळशीराम गिरमे,दिलीप दत्तात्रय गिरमे,रवींद्र काशिनाथ गिरमे,किशोर शरद बोरावके,सुदेश अशोक बोरावके,वैभव सूर्यभान गिरमे,प्रीतम जगन्नाथ सपकळ,जयश्री अनिल गिरमे,मंजुषा नितीन बोरावके,राजेंद्र केशवराव गिरमे,आदी ची बिनविरोध निवड झाली आहे.अनुसूचित जाती जमाती व भटक्या जातीच्या दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.
तर या पदाधिकाऱ्यांची निवड सहकार निवडणूक अधिकारी आर.एन.रहाणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली आहे.त्यात या संस्थेच्या अध्यक्षपदी वैभव सूर्यभान गिरमे यांची तर उपाध्यक्ष जयश्री अनिल बोरावके यांची निवड झाली असून नूतन पदाधीकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.