जाहिरात-9423439946
निवडणूक

शिर्डी नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी ग्रामस्थांनीं निवडणूकपूर्व शिर्डी नगरपंचायतीचे रुपांतर शिर्डी नगरपरिषदेत व्हावे अशी एकमुखी मागणी केली होती.त्याबाबत शिष्टमंडळही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते या पार्श्वभूमीवर सकारात्मक निर्णय बाहेर पडला असून शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषद करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्याबाबत शिर्डी येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अ.,नगर जिल्ह्यातील काही नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरु असून यामध्ये शिर्डी नगरपंचायतीचा समावेश आहे.परंतु मागील अनेक वर्षापासून शिर्डीची लोकसंख्या वाढत जाऊन ती ३१ हजार पार झाली आहे.त्यामुळे या शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर व्हावे अशी स्थानिक ग्रामस्थांची निवडणूकपूर्व मागणी समोर आली होती त्यातून हा निर्णय समोर आला आहे.

अ.,नगर जिल्ह्यातील काही नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरु असून यामध्ये शिर्डी नगरपंचायतीचा समावेश आहे.परंतु मागील अनेक वर्षापासून शिर्डीची लोकसंख्या वाढत जाऊन ती ३१ हजार पार झाली आहे.त्यामुळे या शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर व्हावे अशी स्थानिक ग्रामस्थांची निवडणूकपूर्व मागणी समोर आली होती.साईबाबा संस्थानचे नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांचे महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करून हा निर्णय घेतला आहे.
सदर प्रसंगी गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश गोंदकर,माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते,भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,दीपक वारुळे यांनी अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होंता.
अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास खात्याने शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देणेबाबत तातडीने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.तसेच या अधिसूचनेबाबत शिर्डी ग्रामस्थांना कोणताही आक्षेप असेल तर आज (दि.३) पासून ३० दिवसाच्या आत आपला लेखी आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविणे आवश्यक असल्याचे सदरच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे शिर्डी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे त्यांनी संस्थांचे नूतन अध्यक्ष आ.काळेंचे कौतुक केले आहे.व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close