जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावात मोठ्या प्रमाणावर मतदान संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या आज संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेत १११ मतदान केंद्रात ६३ हजार ८७२ मतदारांपैकी २७ हजार ४६३ पुरुष तर २५ हजार ०३० महिला असे एकूण ५२ हजार ४ ९३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून हि टक्केवारी ८२.१८ टक्के असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली असून निवडणूक सर्वत्र शांततेत पार पडली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे.आता नागरिकांचे लक्ष येत्या १८ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या मतमोजणी कडे लागले आहे.

मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होणार असल्याची माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या १४ हजार २३४ गावांमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या आहेत.काही अपवाद वगळता राज्यभर शांततेत मतदान पार पडले.आता लक्ष लागले आहे ते १८ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे. आज मतदान शांततेत पार पडले असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही ठिकाणी ईव्हिएम मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या काही वेळ रांगा लागल्याचं दिसून आलं.मात्र प्रशासनानं तात्काळ त्यावर उपाययोजन करत प्रक्रिया सुरळीत केली आहे.

राज्यात ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली.यातील काही गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या.एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ०१ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते.परंतु, कोविड-१९ ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता.यासह डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात आली आहे.

मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होणार असल्याची माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत.गावनिहाय आकडेवारी येण्यास उशीर लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close