निवडणूक
निवडणूक प्रशिक्षणाचा सदुपयोग करावा-आवाहन
न्यूजसेवा जनशक्ती
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेचे महत्व समजून देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा या निवडणुकीत सदुपयोग करावा असे असे आवाहन राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी एका कार्यक्रमात केले आहे.
कोपरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून आज कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष,सहाय्यक कर्मचारी असे ६६० लोकांना प्रशिक्षण संत जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास १ येथे संपन्न झाले आहे.त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रशिक्षणात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन,मतदान यंत्राची प्राथमिक माहिती,कोरोना संसर्ग काळात घ्यावयाची काळजी तसेच मतदान यंत्रावरील मतपत्रिका ही अनुसूचित जाती करीता फिका गुलाबी रंग,अनुसूचित जमाती करिता फिका हिरवा रंग,नागरिकांच्या मागास प्रवर्ग करिता फिका पिवळा रंग,सर्व साधारण उमेदवार करिता सफेद रंग,स्री राखिव करिता संवर्गनिहाय मतपत्रिकेचा रंग व स्री राखीव असे नमूद केले जाणार आहे.यासह मतदान प्रक्रियेबाबत मोठ्या पडद्यावर चलचित्र दाखवून मार्गदर्शन केले.पुढील प्रशिक्षण शुक्रवार दि.८ जानेवारी रोजी होणार आहे.
सदर प्रशिक्षणास शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचलन सुरेश गोरे यांनी केले.