जाहिरात-9423439946
निवडणूक

गाव पातळीवरील सुज्ञ उमेदवारांना निवडून आणा-तालुकाध्यक्ष

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाघाडीत सामील असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून आणावे व जेथे असे उमेदवार नसतील त्या ठिकाणी गावचा स्थानिक विकास करणाऱ्या सुज्ञ उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.

राज्यात महाघाडीचे सरकार आहे.त्यात शिवसेना,राष्ट्रवादी,व आमच्या पक्षाचा समावेश असल्याने व तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदारपदी आशुतोष काळे हे नेते असल्याने आम्ही मित्र पक्षाबरोबरच राहणार आहे-नितीन शिंदे,तालुकाध्यक्ष काँग्रेस ,कोपरगाव तालुका.

राज्यातील १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक आगामी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होऊन संपन्न होत आहे.तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी,भाजप,मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे.त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार आहे.मात्र सरपंचाचे आरक्षण नंतर जाहीर होणार असल्याने ग्रामपंचायतीची रया गेल्याचे दिसत आहे.व खर्च करण्यासाठी जो-तो एकमेकांकडे पाहत आहे.तसा कोपरगावात हा खेळ साखर सम्राटांना नवा नाही त्यामुळे या तालुक्यात फार काही निष्पन्न होण्याची शक्यता कमीच आहे.या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे.सातव्या दिवशी विक्रमी ४०० इच्छुकांनी आपले नामनिर्देशन दाखल केले आहे.आज हा आकडा उच्चांकी होणार आहे.आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रात इच्छुकांची संख्या निष्पन्न होणार आहे.व त्यानंतर तालुक्याचे चित्र बऱ्याच अंशी निष्पन्न होण्यास मदत होणार आहे.या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे.

त्यावेळी पुढे बोलताना नितीन शिंदे म्हणाले की,”राज्यात महाघाडीचे सरकार आहे.त्यात शिवसेना,राष्ट्रवादी,व आमच्या पक्षाचा समावेश असल्याने व तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदारपदी आशुतोष काळे हे नेते असल्याने आम्ही मित्र पक्षाबरोबरच राहणार आहे.मात्र जाहीर झालेल्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी आमचें कार्यकर्ते असतील तेथे मित्रपक्षाला मदत करतील.व जेथें नसतील तेथे काँग्रेसच्या निष्ठावान सहकाऱ्यांनी ग्रामविकासाला पूरक ठरतील अशाच पात्र, तत्वनिष्ठ उमेदवारांना मदत करावी असे आवाहनही नितीन शिंदे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close