जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा धुराळा सुरु !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून २३ डिसेंबर सुरुवात झाली आहे.नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दुसऱ्या दिवशी जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीत १२ तर वेळापूर ग्रामपंचायतीत ०३ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी,भाजप,मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे.त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार आहे यात शंका नाही.मात्र सरपंचाचे आरक्षण नंतर जाहीर होणार असल्याने ग्रामपंचायतीची रया गेल्याचे दिसत आहे.व खर्च करण्यासाठी जो-तो एकमेकांकडे पाहत आहे.तसा कोपरगावात हा खेळ साखर सम्राटांना नवा नाही त्यामुळे या तालुक्यात फार काही निष्पन्न होण्याची शक्यता कमीच आहे.

राज्यातील १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.२०२०-२१ च्या निवडणुकीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.त्यापैकी एक म्हणजे सरपंच-उपसरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर जाहीर होणार आहे.एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण १४,२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च २०२० मध्ये सुमारे १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार १७ मार्च २०२० ला स्थगित करण्यात आल्या होत्या.आता निवडणूक आयोगानं २० नोव्हेंबरच्या आदेशान्वये एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे.या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ०१ डिसेंबर २०२० रोजी सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून,०७ डिसेंबर २०२०पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत.०९ डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सदर निवडणुका पार पाडताना कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही निवडणूक आयोगानं केलं आहे.महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे.महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचा समज असल्याने शिवसेना व अन्य आघाडीच्या घटक पक्षांनी यात जोरदार रंग भरण्यास प्रारंभ केला आहे.त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही.
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारली जातील.शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्रे ०४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ०५.३० या वेळेत होईल.मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रात वेळापूर प्रभाग क्रमांक जागा आरक्षण स.सा.पू.-१ मध्ये ०२ अर्ज,प्रभाग क्रं.-२ मध्ये स.सा.स्त्री.-०१ अर्ज दाखल झाला आहे.तर जेऊर पाटोदा येथे आज दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रं.-१ मध्ये आरक्षण स.सा.स्रि.-१ अर्ज,एस.टी.-१ अर्ज,एस.सी.-१ अर्ज,प्रभाग क्रं.२ मध्ये आरक्षण स.सा.पू.-१ अर्ज,प्रभाग क्रं.-३ मध्ये स.सा.पू.-१ अर्ज.प्रभाग क्रं.४ मध्ये ना.म.प्र.०२ अर्ज, ना.म.प्र.स्त्री -१अर्ज.स.सा.स्त्री -१ अर्ज असे एकूण १२ अर्ज दाखल झाले आहे.आता दिवसागणिक या निवडणुकीत रंग भरला जाणार असून कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता कमीच असून तसे प्रोत्साहन देताना सत्ताधारी व विरोधक असे कोणीही दिसत नाही हे विशेष !

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close