जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

अन्य सहकारी संस्था प्रमाणे ग्रामपंचायती बिनविरोध करा-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राजकारणात अहंम भूमिका वठवणारे काळे-कोल्हे आदी नेते त्यांचे साखर कारखाने वा त्यांच्या हिताच्या संस्था निवडणूक बिनविरोध करतात त्याचप्रमाणे सध्या होऊ घातलेला ग्रामपंचायती निवडणुकाही करोना पार्श्वभूमीवर त्यांनी बिनविरोध करून द्याव्या अशी महत्वपूर्ण मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे.त्यामुळे तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे या मागणीकडे लक्ष लागले असून यावर या नेत्यांची प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे.

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता संपन्न होता असून तालुक्यातील स्वहित असलेल्या निवडणुका कोपरगावातील राजकीय नेते बरोबर बिनविरोध पार पाडतात मात्र ग्रामपंचायतींचा शिमग्याला मात्र रसद पुरवून त्या जोरात कशा होतील याची तजवीज केली जाते.त्यात भाऊ-भावाच्या डोक्यात दगड घालायला कमी करत नाही या पार्श्वभूमीवर हि मागणी महत्वपूर्ण ठरली आहे.

करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे.मुदत संपलेल्या राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार १५ जानेवारीला मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला.या वर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या.त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली.त्यावरूनही राजकारण पेटले होते. प्रकरण कोर्टातही गेले होते.त्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता संपन्न होता असून तालुक्यातील स्वहित असलेल्या निवडणुका कोपरगावातील राजकीय नेते बरोबर बिनविरोध पार पाडतात मात्र ग्रामपंचायतींचा शिमग्याला मात्र रसद पुरवून त्या जोरात कशा होतील याची तजवीज केली जाते.त्यात भाऊ-भावाच्या डोक्यात दगड घालायला कमी करत नाही.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या बातमीला महत्व प्राप्त झाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांबरोबर नितीन शिंदे यांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली आहे.यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोल्हे- काळे-परजणे सर्वजण एकत्र येऊन सहकारी (?) साखर कारखाने,दूध संघ,बाजार समिती, बिनविरोध करतात. याठिकाणी आपल्या बगल बचांची नेमणुक करून सच्चा कार्यकर्त्यावर अन्याय केला जातो.मात्र तालुक्यातील अन्य निवडणुकीत घराघरात भांडणे लावून आपापसात झुंज लावून दिल्या जातात.यामध्ये जनतेची फसवणूक करतात.गत तीन बाजार समितीच्या निवडणुकांत सर्वजण एकत्र आले व मिळून सत्ता उपभोगत आहेत.तसेच जर त्यांनी राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप,काँग्रेस,आर.पी.आय.,शेतकरी संघटना व आणि सर्वच पक्षाच्या गावागावातील कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांना उमेदवारी देऊन तालुक्यातील सध्या होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका कोरोनाचा मोठा धोका असल्याने बिनविरोध कराव्या.पारनेरचे आ. निलेश लंके यांनी त्यांच्या तालुक्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचातीस २५ लाख विकासाकरता देण्याची घोषणा केली आहे.त्या पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्यातील ही खासदार-आमदार निधी बरोबरच संजीवनी,कोळपेवाडी साखर कारखाने व गोदावरी दूध संघाने बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतच्या गावाच्या विकासाकरता २५ लाखांचा निधी द्यावा अशी मागणी केली आहे.यातून या नेत्याना खरा कळवळा दिसून येईल.असे शेवटी नितीन शिंदे यांनी म्हटले आहे. या बैठकीस विष्णुपंत पाडेकर,ज्ञानेश्वर भगत,राहुल गवळी,चंद्रहर जगताप,शब्बीर शेख,राजेंद्र औताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close