जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण जाहीर !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुक्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींचे आरक्षण आज तहसीलदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आले असून यात अनुसूचित जातीसाठी १० ग्रामपंचायती जाहीर झाल्या आहेत त्यात कोळगाव-थडी,धोत्रे,सोनवाडी,पढेगाव,मुर्शतपुर,अंचलगाव,तळेगाव-मळे,कोळपेवाडी,आपेगाव,घारी आदी दहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्यामुळे कोठे समाधान तर कोठे नाराजी असे चित्र पाहायला मिळाले आहे.

  

दरम्यान अनुसूचित जमातीसाठी जाहीर करण्यात आलेल्या १६ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे.त्यात मनेगाव,खिर्डी-गणेश,काकडी-मल्हारवाडी,भोजडे,मढी बुद्रुक,सुरेगाव,खोपडी,नाटेगाव,शिंगणापूर,वारी,बहादराबाद,बहादरपूर,खोपडी,रांजणगाव-देशमुख,जवळके,शहापूर आदींचा समावेश आहे.

   महाराष्ट्रात,ग्रामपंचायती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम,१९५८ च्या कलम ५ नुसार नियंत्रित केल्या जातात.राज्यात नवीन ग्रामपंचायत स्थापन करताना लोकसंख्येचा विचार केला जातो.सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचे व्यवस्थापन केले जाते.ग्रामपंचायत हा पंचायत राजमधील सर्वात खालचा पण महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रात २७,९५१ ग्रामपंचायती आहेत.कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सन-२०२५-२०३० या कालावधीसाठी आरक्षण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचे उपस्थितीत आज जाहीर करण्यात आले आहे.यात ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण जागा पैकी ५०% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.इतर मागासवर्गीय घटकामध्ये मोडणाऱ्यांसाठी लोकांकरीता २७ % जागा आरक्षित आहेत.

  

   “सन-१९९५ साली ओगदी इतर मागास प्रवर्ग महिला आरक्षण झालेले आहे.आता पुन्हा एकदा सदर महिलेला आरक्षण मिळणार असल्याने पुरुषांवर अन्याय होणार आहे.स्री आरक्षण असेल तर पुरुषास जागा लढवता येत नाही मात्र पुरुषाच्या जागेवर ती उभी राहू शकते हा उघड भेदभाव दिसत आहे.त्यामुळे स्री पुरुष समान जाहीर करणाऱ्या सरकारने हा भेदभाव दूर करावा”-बाळनाथ दादा जोरवर,ओगदी.

 

बाळनाथ जोरवर,कार्यकर्ते.

  दरम्यान अनुसूचित जमातीसाठी जाहीर करण्यात आलेल्या १६ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे.त्यात मनेगाव,खिर्डी-गणेश,काकडी-मल्हारवाडी,भोजडे,मढी बुद्रुक,सुरेगाव,खोपडी,नाटेगाव,शिंगणापूर,वारी,बहादराबाद,बहादरपूर,खोपडी,रांजणगाव-देशमुख,जवळके,शहापूर आदींचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करताना तहसीलदार महेश सावंत व त्यांचे सहकारी दिसत आहे.

   तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तालुक्यातील २० ग्रामपंचायतींचा समावेश झाला असून त्यात माहेगाव-देशमुख,कारवाडी,ओगदी,बोलकी,येसगाव, कोकामठाण,तिळवणी,कान्हेगाव,डाउच बुद्रुक,जेऊर कुंभारी,देर्डे-कोऱ्हाळे,मढी खुर्द,पोहेगाव,गोधेगाव,उक्कडगाव,दहेगाव बोलका,सोनारी,धारणगाव,चासनली,वडगाव आदींचा समावेश झाला आहे.

यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणासाठी  ०८ ग्रामपंचायती होत्या त्यातील ०६ ग्रामपंचायतीची सोडत पद्धतीने (चिठ्ठी ) लहान मुलगी कु.नियारा क्षीरसागर या मुलीच्या हाताने काढले तो क्षण.

   दरम्यान यातील सर्वसाधारण सरपंच पदाच्या २९ जागांसाठी ग्रामपंचायती निश्चित असून त्यात मोर्विस,धामोरी,मायगाव देवी,सांगवी भूसार,मळेगाव थडी,रवंदे,कुंभारी,मंजूर,बक्तरपुर,हंडेवाडी,शहापूर,हिंगणी,ब्राम्हणगाव,करंजी बुद्रुक,टाकळी,चांदगव्हाण,जेऊर-पाटोदा,संवत्सर, कासली ,शिरसगाव,लौकी, सडे,देर्डे-चांदवड, डाऊच खुर्द,चांदेकसारे,अंजनापुर,धोंडेवाडी,वेळापूर,वेस-सोयगाव आदींचा समावेश झाला आहे.

यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणासाठी  ०८ ग्रामपंचायती होत्या त्यातील ०६ ग्रामपंचायतीची सोडत पद्धतीने (चिठ्ठी ) लहान मुलीच्या कु.नियारा क्षीरसागर या मुलीच्या हाताने निघालेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहे.सोनारी,वेळापूर,चासनळी,उक्कडगाव,दहिगाव,धरणगाव,चासनळी,वडगाव आदींचा समावेश आहे.

सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत यांचेसह नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे,प्रफुल्लिता सातपुते,सौ.बानगर आदी मान्यवरांसह बहु संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close