जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगावात आचार संहितेचा भंग,तक्रार दाखल !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    महाराष्ट्रात विधासभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.प्रचारसभांचा धडाका सुरु असताना कोपरगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार संजय काळे यांनी थोरले पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप वर्पे यांनी आपल्या बॅनरवर व बनवलेल्या धूनित आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार निवडक अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार अपक्ष उमेदवार संजय काळे.

  

सदर प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी अशी तक्रार आल्याच्या माहितीस दुजोरा दिला असून सदर जाहीर सभेतील फलकावरील मजकूर व आक्षेपार्ह धून हटवली असल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी महेश सावंत यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

थोरल्या पवारांचे उमेदवार संदीप वर्पे व त्यांचे नेते शरद पवार यांचे संग्रहित छायाचीत्र.

   महाराष्ट्रात विधासभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.नगर सह राज्यात प्रचारसभांचा धडाका सुरु आहे.शरद पवार यांनी कोपरगाव मतदार संघात आपल्या पक्षाचे उमेदवार संदीप वर्पे,राहाता मतदार संघात प्रतिभाताई घोगरे,राहुरीत प्राजक्त तनपुरेंसाठी सभा घेतली.या सभेत त्यांनी भाजपावर आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली असून अद्याप आज आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी धाकट्या पवारांची सभा आज सायंकाळी पाच वाजता कोपरगाव मतदार संघात संपन्न होत आहे.त्यामुळे आता या लढतीत रंगत वाढू लागली आहे.त्यातच माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी आपल्या प्रचारास जोर लावला आहे.त्यांच्या सोबत जवळके येथील एक माजी सैनिक खंडू गहिनीनाथ थोरात,शिवाजी कवडे,शकील चोपदार,किरण चांदगुडे,चंद्रहंस औताडे,दिलीप गायकवाड,विजय जाधव,विश्वनाथ वाघ आदी बारा जण आपले नशीब आजमावत आहेत.त्यातील संजय काळे,खंडू थोरात,शिवाजी कवडे आदींनी आपल्या परीने प्रचार सुरू केला आहे.त्यात ही सर्व मंडळी आपला,’एकला चलो रे’ चा कार्यक्रम राबवत असताना दिसत आहे.त्यामुळे आता या निवडणुकीत चांगलीच चुरस वाढताना दिसत आहे.

   दरम्यान या निवडणुकीत एक गंभीर घटना उघड झाली आहे.यात अपक्ष उमेदवार संजय काळे यांनी निवडणूक अधिकारी यांचेकडे एक लेखी तक्रार दाखल केली असून यात थोरल्या पवारांचे उमेदवार संदीप वर्पे यांनी जी राष्ट्रवादीची धून तयार केली आहे.त्यावर व शरद पवार यांचे कार्यक्रमाचे व्यासपीठावर,”रामकृष्ण हरी वाजवा,तुतारी”या धार्मिक ओळीवर आक्षेप घेतला असून हा विशिष्ठ धर्माला आकर्षित करण्यासाठी हा गंभीर उद्योग केला असल्याचा आरोप केला आहे.त्यातून अन्य धर्माला कमी लेखण्याचा प्रकार झाला असल्याचा त्यांचा आरोप आहे.त्यासाठी जिल्हा पातळीवर निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी असे करता येणार नाही असा खुलासा केला आहे.त्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हा भंग असल्याचा त्यांनी आरोप केला आहे व सदर उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची शेवटी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

   सदर प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी अशी तक्रार आल्याच्या माहितीस दुजोरा दिला असून सदर जाहीर सभेतील फलकावरील मजकूर व आक्षेपार्ह धून हटवली असल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी महेश सावंत यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close