जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

सामान्य असलेल्या बडदेंनी तुमच्या आजोबांचा पराभव केला हे विसरू नका-वर्पे

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

माझी टिंगल करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी माजी खा.भिमराव बडदे यांनी साधे नगरसेवक न होता तुमच्या आजोबांना (माजी खा.स्व.शंकरराव काळे) पराभूत केले याची जाणीव ठेवा आगामी काळात तुमचा पराभव अटळ आहे असे आव्हान महाआघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांनी नुकतेच एका प्रचार सभेत केले आहे.

सदर प्रसंगी योगेश बागुल यांनी विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून कामाचे १० टक्के कमिशन घेतले असा आरोप करून पाच क्रमांकाच्या तलावाचे काम संदीप वर्पेसह आम्ही सर्व नगरसेवक यांनी बहुमताने ठराव करून मार्गी लावले असल्याचा दावा केला आहे.

  

बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले असून राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असून याबाबत राज्यासह कोपरगाव विधानसभा मतदार संघात निवडणूक रंग भरू लागली असून आज सायंकाळी खडकी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर महा आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांची प्रचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मधुकर पवार हे होते.

सदर प्रसंगी प्रमोद लबडे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,संजय सातभाई,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे,दिपक साळुंके,काँग्रेसचे सचिव नितीन शिंदे,माजी शहराध्यक्ष भरत मोरे,विजय मुंगसे,कालू आप्पा आव्हाड,अस्लम शेख,संजय पवार,कलविंदर दडियाल,
ऍड.नितीन पोळ,हारूनभाई बागवान,मधुकर पवार,आदींसह मोठ्या संख्येने मतदार कार्यकर्ते उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समोरचा उमेदवार (आशुतोष काळे) हे जन्मापासून ए.बी फार्म घेऊन आल्याची टीका करून आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निष्ठावान व सामान्य कार्यकर्ते आहोत.सामान्य नागरिकांची लढाई आपण लढत आहोत.एकवीस नगरसेवक एका बाजूस होते.त्यांची दखल तुम्ही घेत नाही.माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी तलावासाठी जमीन घेऊन दिली यांचे श्रेय नाही का असा सवाल केला आहे.त्यांना जमीन घेऊन दिली ज्यांनी जमीन घेऊन दिली त्यांना संजीवनी साखर कारखान्यात नोकऱ्या दिल्या आहेत.आपण पत्र देऊन हा विषय मार्गी लावला ते व्हि.डी.ओ.तुम्ही प्रसारित केले आहे.आता त्याचे श्रेय तुम्ही कसे घेता असा सवाल केला आहे.शरद पवार यांचेशी तुम्ही गद्दारी केली असल्याचा आरोप केला आहे.खडकीच्या जनतेला अद्याप उतारे दिले नाही.दिड हजार कोटी रुपये विमानतळासाठी शासनाने दिले आहे.केंद्रातील निधी तुम्ही तुमच्या हिशेबात धरता कसे असे कसे दावा करता असा सवाल केला आहे.चमकोगिरी बंद करा.आमचा पराभव झाला असे सांगून आमची बदनामी बंद करा.तुमच्या आजोबांना नगरपालिकेत पराभूत झालेल्या माजी खा.भिमराव बडदे यांनी केला होता विसरू नका असा इशारा दिला आहे.व्यक्तिगत पातळीवर निवडणूक आणू नका.आपण दुबळे आहे असे समजू नका आपण शरद पवार,उध्दव ठाकरे,नाना पटोले यांचे उमेदवार आहोत हे विसरू नका.तुम्हाला आमदार कोण पाहिजे ? आठ दिवसांनी भेटणाऱ्याना निवडून देणार आहे का ? आपल्याकडे कोणतीही संस्था नाही त्यामुळे चौकशीची भीती नाही,फुटण्याची भीती नाही.त्यामुळे आपण सडा फटिंग माणूस आहे.कपडे फाटण्याची भीती नाही असे सांगून थेट आ.आशुतोष काळे यांना आव्हान दिले आहे.लोकसभेत तुम्हाला लोकांनी तुमची जागा दाखवली त्यामुळे तुम्ही ठिकाणावर आले व लाडकी बहिणीचे दिड हजार प्रतीमाह सुरू केले ते काही महायुती सरकारने व त्यांच्या नेत्यांनी जमिनी विकून दिलें नाहीं.आम्ही महिलांना दोन नाही तीन हजार रुपये महिन्याला देणार आहे.तत्कालीन पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची ७० हजार कोटींची कर्जमाफी आमचे नेते शरद पवार यांनी केली होती याची आठवण करून दिली आहे.
आम्ही निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मर्यादित ४० लाखांच्या खर्चात निवडणूक लढवणार आहे.मात्र समोरच्या नेत्यांचे भरपूर चॉकलेट (पैसे) देतील ते घ्या पण आपल्या महाआघाडीच्या उमेदवारास निवडून द्या असे आवाहन केले आहे.तुमचा कान धरणारा माणूस निवडून देऊ नका तर तुमचा कान हातात देणारा माणूस निवडून द्या असे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी संजय सातभाई यांनी महाआघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांना निवडून दिले तर खडकीचे नागरिकांना त्यांची घरे त्यांच्या नावावर करून दिले जातील.सलग्न रस्ते काँक्रीटीकरण केले जातील असे आश्र्वासन दिले आहे.

   सदर प्रसंगी प्रमोद लबडे यांनी कोपरगाव तालुक्याचे शेती सिंचनाचे पाणी संपून गेले आहे.पाणी केवळ पिण्यापूर्ते उरले आहे.संदीप वर्पे हे सामान्य कुटुंबातील व गोधडी पांघरणारा माणूस आहे.आमचे संदीप वरपे तुमच्या सहकारी कारखानदारीला हात लावणार नाही असे आश्वासन दिले आहे.पण तुम्ही आडवे येऊ नका असे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी प्रमोद लबडे,कैलास जाधव,योगेश बागुल,दिनेश पवार,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक कैलास जाधव,सूत्रसंचलन मनोज कपोते यांनी केले असून उपस्थितांचे आभार राहुल देशपांडे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close