जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

नेवासा मतदार संघात…या संघटनेचा प्रवेश !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीत आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांचा अर्ज आज दुपारी १.३० वाजता सीफाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या हस्ते तर क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखीले यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक अधिकारी अरुण उंडे यांचेकडे मोठ्या उत्साहात सुपूर्त करण्यात आला आहे.

नेवासा विधानसभा मतदार संघात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक लढविण्याची घोषणा केली असल्याने नेवासा मतदार संघात आणखी रंगत वाढली असल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक निर्णायक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.आज २८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चौथी यादी जाहीर करण्यात आली असताना नेवासा विधानसभा मतदार संघात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली असल्याने नेवासा मतदार संघात आणखी रंगत वाढली असल्याचे दिसून आले आहे.

ऍड.अजित काळे यांनी आज पर्यंत निळवंडे कालवा कृती समितीच्या दोन जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२ दुष्काळी गावांसाठी न्यायिक लढ्यात मोठे योगदान दिले असून श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत नऊ गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून न्याय देण्यासह,शेतकऱ्यांची कर्जमाफी अंमलात आणण्याचे विविध कामे केली आहे.त्यामुळे प्रस्थापितामध्ये खळबळ उडाली आहे.


  सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सिफाचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखीले,शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,किरण लंघे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काळे,नानासाहेब गाढवे,कौसर सय्यद,रावसाहेब मासाळ,भिवराज शिंदे,तालुकाध्यक्ष अशोक काळे,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप,अजित तुवर,तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे,दत्तू निकम,भाऊसाहेब काळे,उर्फ ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष हरिआप्पा तूवर,दादासाहेब नाबदे,धनंजय कंक,सागर लांडे,सोमनाथ औटी,ऍड.बाळासाहेब कावळे,ऍड.संभाजी पवार,अनिल साळुंके,युवा आघाडी अध्यक्ष डॉ.रोहित कुलकर्णी,रामदास माकोणे,सुधाकर देशमुख,संजय ठुबे,कमलेश नवले,तालुका प्रसिध्दी प्रमुख नरेंद्र काळे,कैलास पवार,शरद आसने,भास्कर तुवर,महिला आघाडीच्या कार्यकर्त्या भावना अजित काळे,ठकाजी बाचकर,ऍड.साक्षी गणेश काटे (काळे),शोभा काळे,छाया कावळे,चंद्रकला काळे,ऍड.अभिजित काळे,शहाराध्यक्ष प्रदीप नवले,देविदास नागवडे,कैलास नागवडे,बापूसाहेब नागवडे,आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close