जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

मी मॅनेज असेल तर आ.काळेंनी मतदार संघ सोडून दाखवावा-खुले आव्हान

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

माझ्याबाबत गैरसमज पसरविण्याचे काम मतदार संघात सुरू आहे.आमचा उमेदवार असल्याचा अपप्रचार करतात.त्याला त्यांनी आमचा तुमच्याशी काही एक संबंध नसल्याचे सांगून मी डमी उमेदवार आहे तर तुम्ही मतदार संघ सोडून दाखवा असे खुले आव्हान महायुतीचे आ.आशुतोष काळे यांना महाआघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांनी आज एका कार्यक्रमात दिले आहे.

  

“आम्ही सेनेच्या इच्छुकांच्या मागणी प्रमाणे आम्ही एकमुखाने राजेंद्र झावरे यांची मागणी केली होती.मात्र आमच्या नेत्यांनी एकमताने संदीप वर्पे यांना उमेदवारी जाहीर केल्याने उद्या सकाळी ११ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात आम्ही महाआघाडीच्या वतीने संदीप वर्पे यांची उमेदवारी भरणार आहे”- शिवाजी ठाकरे,माजी तालुका प्रमुख,उबाठा,शिवसेना.

कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच क्रमांकाच्या तलावाचे श्रेय एकट्या आ.आशुतोष काळे यांचे नसून त्यात शरद पवार या आमच्या नेत्यांनी माती उचलण्यास सांगितले,आम्ही नगरपरिषद ठराव एकमताने मंजूर केला,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निधी दिला,संजय काळे,राजेश मंटाला यांनी लेखी पाठपुरावा केल्याने हे काम मार्गी लागले आहे”-संदीप वर्पे,उमेदवार,महाआघाडी.

  महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.आज २८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षासह महाआघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप वर्पे यांनी पहिली पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,संजय सातभाई,काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे,उबाठा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमूख कैलास जाधव,शहाराध्यक्ष सनी वाघ,माजी शहरप्रमुख भरत मोरे,कलविंदर दडियाल,दिपक साळुंखे,अस्लम शेख,माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,श्रीरंग चांदगुडे,योगेश बागुल,माजी तालुका उपप्रमुख गंगाधर रहाणे,ऍड.दिलीप लासुरे,राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बापू रांधवणे,किरण खर्डे, पोटे,आदींसह बहुसंह्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


सदर प्रसंगी राजेंद्र झावरे यांनी,”संदीप वर्पे जनतेचा उमेदवार असल्याचे सांगुन आम्ही त्यांना निवडून आणणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

  सदर प्रास्तविक ऊबाठा सेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले त्यावेळी आम्ही सेनेच्या इच्छुकांच्या मागणी प्रमाणे आम्ही एकमुखाने राजेंद्र झावरे यांची मागणी केली होती.उद्या आम्ही महाआघाडीच्या वतीने संदीप वर्पे यांची उमेदवारी भरणार आहे.त्यामुळे तालुक्यात निष्ठावान विरुद्ध निष्ठानिष्टी अशी लढत होत असल्याची माहिती दिली आहे.तालुक्यातील मतदार आपले मत वाया घालवणार नाही असा विश्वास व्यक्त केला व महाआघाडीचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाणार आहे.

   सदर प्रसंगी नितीन शिंदे यांनी,”आमचा आमदार काळे यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.तर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.ऍड.दिलीप लासूरे यांनी,”अर्ज भरताना आ.काळे यांनी एक हजार गाड्या लावल्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करावी,तर बाकी साखर कारखाने ०५ हजार रुपये टनाला देत आहे.तर कोपरगाव तालुक्यात २७०० देत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे सांगून तालुक्याचे शेती सिंचनाचे पाणी कोणी घालवले याचा विचार करा असे आवाहन केले आहे.०३ हजार कोटींचे कमिशन कोठे जिरले याचा विचार करावा व अर्थ प्रलोभनाला मतदारांनी बळी पडू नये असे आवाहन शेवटी केले आहे.

    सदर प्रसंगी पुढे बोलताना संदीप वर्पे म्हणाले की,”आम्हाला राजेंद्र झावरे यांचेसह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आशीर्वाद दिले असून भीमराव बडदे यांनी कोपरगाव मतदार संघात क्रांती केल्याचे सांगितले आहे.महाविकास आघाडीला जनता निवडून दिले जाणार आहे.आम्ही सेना,राष्ट्रवादी,काँग्रेस असे वेगळे नाही एकच आहोत.आमची मने एकदम जुळलेली आहे.इ.डी.चा वापर करून अनेकांना त्रास दिला असल्याचा आरोप केला आहे.लोकसभेत भाजपचा पराभव झाला होता.माझ्याबाबत गैरसमज पसरविण्याचे काम सुरू आहे.आमचा उमेदवार असल्याचा अपप्रचार करतात.त्याला त्यांनी आमचा तुमचा काही संबंध नसल्याचे सांगून मी डमी उमेदवार आहे तर तुम्ही मतदार संघ सोडून दाखवा असे खुले आवाहन दिले आहे.
त्यावेळी झावरे यांच्या विकासकामांची आठवण करून दिली व सामान्य माणूसच क्रांती घडवू शकतो असे सांगून आपल्या वडिलांनी हजारो विद्यार्थी घडवले असून त्यांचे काम मला उपयुक्त ठरणार आहे.आपले नकली राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांशी जवळचे संबंध होते.तरीही आपण मॅनेज होत नाही असे आवाहन शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी उपस्थितांचे आभार श्रीरंग चांदगुडे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close