जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

खा.वाकचौरेंच्या विजयात निळवंडे कालवा समितीचे मोठे योगदान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी०४ लाख ७६ हजार ९०० मते मिळवत सत्ताधारी गटाचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्यावर ५० हजार ५२९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले असून त्यांच्या या विजयात निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील १८२ दुष्काळी गावांतील शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन निळवंडे कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष रमेश दिघे यांनी केले आहे.

  

दरम्यान निळवंडे कालव्यांना आतापर्यंत ५४ वर्षात ज्या ज्या नेत्यांनी विरोध अथवा बनाव केला त्यांचा सातत्याने पराभव होत आला असून यात प्रारंभी माजी मंत्री राम शिंदे,माजी राज्यमंत्री विजय शिवतारे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,माजी आ.वैभव पिचड आणि आता या लोकसभा निवडणुकीत खा.सुजय विखे आणि आता खा.सदाशिव लोखंडे आदींचा पराभव झाल्याची जोरदार चर्चा राज्यासह जिल्ह्यात होत आहे.

राज्यातील आणि देशातील काही मतदारसंघ हे मोठ्या प्रमाणावर चर्चेत राहिले असल्याचे दिसून आले आहे.बारामती लोकसभा मतदारसंघ,रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ,सोलापूर लोकसभा मतदारसंघ,अमरावती लोकसभा मतदारसंघ,अ.नगर उत्तर,दक्षिण लोकसभा मतदारसंघ आदीसह देशात अनेक मतदारसंघामध्ये अनेकांचं लक्ष लागून राहिले होते.एकाच पक्षात पडलेल्या फुटी,विद्यमान आणि माजी खासदारांमध्ये असलेल्या लढती,विद्यमान केंद्रीय मंत्र्यांविरोधात उभे ठाकलेले तगडे उमेदवार यामुळे काही मतदारसंघ लक्षवेधी ठरले होते.त्यात शिर्डीचा लोकसभा मतदार संघही अपवाद नव्हता या ठिकाणी मोठी रंजक लढत झाली होती.यात भाजप,शिंदे गट,राष्ट्रवादी अजित पवार गट आदींची महायुती विरुद्ध शिवसेना उद्धव गट,शरद पवार राष्ट्रवादी गट,काँग्रेस आदींची महाआघाडीचा सामना रंगला होता.त्यामुळे विद्यमान शिंदे गटाचे खा.सदाशिव लोखंडे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात हा सामना रंगला होता.सुरुवातीच्या मतमोजणी पासूनच खा.लोखंडे हे अपेक्षेप्रमाणे पिछाडीवर असल्याचे दिसत होते.आणि घडले ही तसेच.ही आघाडी वाढत जाऊन अखेर त्याचे विजयात रूपांतर झाले आहे.खा.लोखंडे यांच्यापेक्षा उद्धव सेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना उच्चांकी ०४ लाख ७६ हजार ९०० मते मिळाली असून यात त्यांचा लोखंडेवर ५० हजार ५२९ मतांनी मोठा विजय संपादन केला आहे.

छायाचित्रात उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार खा.वाकचौरे व पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे दिसत आहे.

 

दरम्यान शिर्डीचे नूतन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या या विजयाचे दुष्काळी १८२ गावात जोरदार स्वागत झाले आहे.आगामी काळात त्यांच्याकडून निळवंडे प्रकल्पाच्या चाऱ्याचे डिझाईन व तातडीने चाऱ्या होण्यास,पाझर तलाव पूर पाण्याने भरण्यास व दुष्काळी १८२ गावांचे पिण्याचे पाणी आरक्षण होण्यास मदत होणार आहे.

  दरम्यान यात प्रारंभी पासून निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोलाची भूमिका निभावली असल्याचे दिसून आले आहे.खा.वाकचौरे यांनी समितीला केंद्रीय जल आयोगाच्या १७ प पैकी १४ मान्यता मिळवून देण्यात २०१४ पूर्वी अहंम भूमिका निभावली होती.त्यामुळे पुढील ०३ मान्यता उच्च न्यायालयातून ऍड.अजित काळे यांच्या माध्यमातून मिळवणे समितीला सोपे गेले.

  दरम्यान या निवडणुकीत समितीने थेट कुठल्याही राजकीय व्यासपिठाचा वापर केला नाही.मात्र कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांच्या मार्गदर्शनात अध्यक्ष रुपेंद्र काले,माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,गंगाधर गमे,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,गंगाधर रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,सचिव कैलास गव्हाणे,राजेंद्र निर्मळ,सोन्याबापू उऱ्हे,डी.एम.चौधरी,ज्ञानदेव पाटील हारदे,उत्तमराव घोरपडे,रमेश दिघे,जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे,उत्तमराव जोंधळे,सोमनाथ दरंदले,कौसर सय्यद,अप्पासाहेब कोल्हे,ऍड.योगेश खालकर,रंगनाथ गव्हाणे,रावसाहेब मासाळ,रामनाथ पाडेकर,माणिक दिघे,दौलत दिघे,अशोक गांडोळे,भिवराज शिंदे,वसंत थोरात,उत्तमराव थोरात,विठ्ठलराव देशमुख,संदेश देशमुख,वाल्मिक नेहे,बाळासाहेब सोनवणे,सुधाकर गाढवे,भीमराज गुंजाळ,नरहरी पाचोरे,नाना नेहे,भास्कर गव्हाणे,दगडू रहाणे,गोरक्षनाथ रहाणे,विजय थोरात,चंद्रकांत थोरात,दत्तात्रय चौधरी,प्रभाकर मगर आदीनी शेतकऱ्यांत आधी पासूनच जनजागृती करून सावध केले होते.त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून त्याचे सेनेचे उमेदवार खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयात रूपांतर झाले आहे.

  दरम्यान शिर्डीचे नूतन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या या विजयाचे दुष्काळी १८२ गावात जोरदार स्वागत झाले आहे.आगामी काळात त्यांच्याकडून निळवंडे प्रकल्पाच्या चाऱ्याचे डिझाईन व तातडीने चाऱ्या होण्यास,पाझर तलाव पूर पाण्याने भरण्यास व दुष्काळी १८२ गावांचे पिण्याचे पाणी आरक्षण होण्यास मदत होणार आहे असा आशावाद रमेश दिघे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

   दरम्यान निळवंडे कालव्यांना आतापर्यंत ५४ वर्षात ज्या ज्या नेत्यांनी विरोध अथवा बनाव केला त्यांचा सातत्याने पराभव होत आला असून यात प्रारंभी माजी मंत्री राम शिंदे,माजी राज्यमंत्री विजय शिवतारे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,माजी आ.वैभव पिचड आणि आता या लोकसभा निवडणुकीत खा.सुजय विखे आणि आता खा.सदाशिव लोखंडे आदींचा पराभव झाल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close