जाहिरात-9423439946
निवडणूक

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर  जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या  उपस्थितीत जिल्ह्यातील ३ हजार ७३४ मतदान  केंद्रांसाठी द्यावयाच्या मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन)  प्रकिया करण्यात आली आहे.त्यामुळे मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त करणाऱ्यांना चाप लागणार आहे.अ.नगर जिल्ह्यातील मतदारसंघतील १२ विधानसभासाठी वाटप करण्यात आले आहे.तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली आहे.

   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील,भूसंपादन अधिकारी चंद्रशेखर देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर आदी उपस्थित होते.

   जिल्ह्यातील ३७-अहमदनगर लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभा मतदार संघ  व ३८- शिर्डी अनुसूचित जाती लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभा मतदारसंघ अशा एकुण १२ विधानसभा मतदार संघाच्या आवश्यकतेनुसार  ९ हजार ५१७ बॅलेट युनिट,५ हजार १९४ कंट्रोल युनिट आणि ५ हजार ६४४ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. अंतिमतः ४४७८ सीयू,४४७८ बीयु  व ४८५० व्हीव्हीपॅट याचे दोन लोकसभा

मतदारसंघतील १२ विधानसभासाठी वाटप करण्यात आले.
     तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.
       सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जयंत वाघ,प्रताप शेळके,शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजेंद्र दळवी,राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अमोल जाधव,भारतीय जनता पक्षाचे सचिन पारखी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close