जाहिरात-9423439946
निवडणूक

…हि संघटना निवडणूक लढवणार-मदतीचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


देशभरात लोकसभा निवडणुकीचे रण पेटले असून त्यासाठी महायुती आणि महाआघाडी यांच्यात जागा वाटपात मोठी रस्सी खेच सुरु असताना दिसत आहे.यातच शेतकऱ्यांना कोणतेच सरकार न्याय देत नाही व आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही असा वास्तवादी आरोप करत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी या रणात उडी घेतली असून आपणही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हातकंणगले येथील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.त्यामुळे एकीकडे मराठा आंदोलन तर दुसरी कडे शेतकरी संघटना या युद्धात उतरणार असल्याचे सत्ताधारी पक्षाची चिंता वाढली असल्याचे मानले जात आहे.

   

“वर्तमानात सरकारने कांद्याची निर्यात थांबवली आहे.गव्हासह रब्बी पिकांचे भाव खाली आले आहे.ऊसास रिकव्हरीच्या नावाखाली साखर कारखानदार शेतकऱ्यांना लुबाडत आहे.उन्हाळ्यात कार्यक्षेत्रातील ऊस तोड लांबवून शेतकऱ्यांचे १५ ते २० टक्के नुकसान करत आहे.खते, इंधन,औषधे आदींचे दर वाढत आहे.मात्र दुधासह शेतमालाचे दर मात्र पाडले जात आहे.त्यामुळे निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे”-रघुनाथ दादा पाटील,अध्यक्ष,सिफा.

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात असले,तरी शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच आहे.शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे.कर्ज काढून पेरणी करणे,पीक वाचविण्यासाठी अथक मेहनत करूनही कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही.या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी,याची चिंता असते.या व इतर कारणांमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या (एनसीआरबी) अहवालानुसार २०२२ मध्ये देशात झालेल्या एकूण भारतात दररोज सुमारे १५४ शेतकरी आणि रोजंदारी मजूर आत्महत्या करून मरतात,सन-२०२१ मध्ये ही संख्या १४४ इतकी होती.कर्नाटक,आंध्र प्रदेश,तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या.आकडेवारीनुसार,२०२१ मध्ये १,६४,०३३ च्या तुलनेत गेल्या वर्षी १,७०,९२४ आत्महत्या झाल्या,कौटुंबिक समस्या,विवाह-संबंधित समस्या आणि आजारपणामुळे देशातील एकूण आत्महत्यांपैकी ५४.९ टक्के आत्महत्या झाल्या.२०२१ च्या तुलनेत एकूण आत्महत्यांमध्ये सुमारे ४% वाढ झाली आहे.

“राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या (एनसीआरबी) अहवालानुसार २०२२ मध्ये देशात झालेल्या एकूण भारतात दररोज सुमारे १५४ शेतकरी आणि रोजंदारी मजूर आत्महत्या करून मरतात,सन-२०२१ मध्ये ही संख्या १४४ इतकी होती.यावर सत्ताधारी वर्ग काहीही बोलत नाही हि चिंताजनक बाब आहे”-अड्.अजित काळे,उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश शेतकरी संघटना.


   दरम्यान वर्तमानात सरकारने कांद्याची निर्यात थांबवली आहे.गव्हासह रब्बी पिकांचे भाव खाली आले आहे.ऊसास रिकव्हरीच्या नावाखाली साखर कारखानदार शेतकऱ्यांना लुबाडत आहे.उन्हाळ्यात कार्यक्षेत्रातील ऊस तोड लांबवून शेतकऱ्यांचे १५ ते २० टक्के नुकसान करत आहे.खते, इंधन,औषधे आदींचे दर वाढत आहे.मात्र शेतमालाचे दर मात्र पाडले जात आहे.दुधाला भाव भेटत नाही.कामगारांना पगार वेळेवर भेटत नाही.नद्या प्रदूषित केल्या जात आहे.कृष्णां,वारणा,पंचगंगा आदी नद्यांचे पाणी पिण्यायोग्य शिल्लक राहिले नाही.कोणत्याही पक्षाचे खासदार त्यावर संसदेत बोलण्यास तयार होत नाही हे वास्तव असून या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी शेतकऱ्यांचा  प्रतिनिधी गरजेचा असून त्यासाठी आपण हि निवडणूक लढविणे गरजेचे बनले आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या लढ्यास मदत करणे गरजेचे बनले आहे.त्यासाठी त्यांनी आपल्या सामाजिक संकेतस्थळावरून मदतीची मागणी केली आहे.त्यासाठी ‘फोन पे’ चे स्कॅनर प्रसिद्ध केले असून मदतीचे आवाहन शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close