निवडणूक
शासकीय विश्रामगृह कार्यालय परिसरात मनाई आदेश जारी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकसभा निवडणूक २०२४
अहमदनग जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये दि.१६ मार्च ते १३ मे,२०२४ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय,सर्व उप विभागीय अधिकारी कार्यालये,सर्व तहसिल कार्यालये तसेच शासकीय विश्रामगृह येथे कोणत्याही प्रकारची मिरवणूक,मोर्चा काढणे, आंदोलन करणे,उपोषण करणे,कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे,वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे,कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे एक आदेशाद्वारे कळविले आहे.
त्यामुळे राजकीय पक्षांना चाप बसणार आहे.मात्र धार्मिक कार्यक्रमांच्या आडून प्रचार करण्यास राजकीय पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्याना स्वातंत्र्य दिले किंवा कसे या बाबद आदेशात सविस्तर मौन पाळले आहे.त्यामुळे त्याचा राजकीय पक्ष गैरफायदा घेऊ शकतात असे नागरिकांत बोलले जाऊ लागले आहे.