जाहिरात-9423439946
निवडणूक

फेकन्युजची माहिती देण्यासाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४  च्या कालावधीमध्ये उमेदवारांची प्रचारा दरम्यान बदनामी करणे,अफवा पसरविणे,द्वेषपुर्ण संदेश,खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया,सोशल मिडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेकन्युजची माहिती जनतेकडून मिळण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला असुन त्याचा क्रमांक 9156438088 असा असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एका पत्राद्वारे दिली आहे.

“लोकसभा प्रचारादरम्यान उमेदवारांची बदनामी करणे,अफवा पसरविणे,द्वेषपुर्ण संदेश,खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया,सोशल मिडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेकन्युजची माहिती जनतेकडून मिळण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला असुन त्याचा क्रमांक 9156438088 असा आहे”-राकेश ओला,पोलीस अधीक्षक,अ.नगर जिल्हा.

या क्रमांकावर जनतेकडून मिळालेल्या माहितीची नियंत्रण कक्षातील प्रभारी नियंत्रण अधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक (सायबर) यांच्या मदतीने माहितीची शहानिशा करुन आावश्यक ती कारवाई करावी,असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे फेक न्यूजला आळा बसण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या आदेशाचे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आदींनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close