जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नदी प्रदूषण

गणेशमूर्ती विसर्जनावरून कोपरगावात पडले दोन तट !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

घनकचरा,सांडपाणी तसेच केमिकल कंपन्यांकडून वर्षभर नद्यांमधे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असते त्याकडे दुर्लक्ष करून शासन व तथाकथित पर्यावरणवादी मात्र वर्षातुन एकदा होणाऱ्या गणेश विसर्जनास विरोध करुन कृत्रिम तलाव तसेच हौदात गणेश विसर्जनास नागरीकांना भाग पाडत असून हि बाब चुकीची असल्याचे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीने नुकतेच एका निवेदनाद्वारे केले आहे.तर या आधीच पर्यावरणवादी कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे यांनी सदर मूर्ती गोदावरीत विसर्जन करून नये असे आवाहन केले आहे.त्यामुळे या प्रश्नावरून कोपरगाव शहरात दोन तट पडल्याचे उघडपणे दिसत आहे.

कोपरगावात गोदावरी नदीतील मासे मृत्युमुखी पडले असल्याचे सप्रमाण यापूर्वी शिवसेनेचे कार्यकर्ते व माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सिद्ध केले आहे.त्यामुळे पर्यावरणवादी आदिनाथ ढाकणे आदी व्यक्तींनी त्या विरोधात ओरड करण्यास प्रारंभ केला आहे त्यात चूक आहे असे म्हणता येणार नाही.मात्र हिंदु जनजागृती समितीचा दावा एकदम खोटा ठरवता येणार नाही.वर्षभर पाणी दूषित करणारे महाकाय कारखाने मोकाट सोडून द्यायचे व एक दिवस गणेश मूर्ती विसर्जन करण्यास विरोध करणे म्हणजे दरवाजा सताड मोकळा सोडून मोरीस बोळा घालण्याचा हा प्रकार म्हटला पाहिजे.

अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात.महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात.या दिवशी परंपरेने नदी नाल्यात गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते.प्रारंभी यामुर्ती मातीच्या असत मात्र उत्तरोत्तर हा शाडूच्या बनविण्यास प्रारंभ झाला व त्यानंतर त्या पासून नदी नाल्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते असे म्हटले जाऊ लागले आहे.गोदावरी नदीतील पाणी पिण्यायोग्य राहिले नाही असा अहवाल प्रदूषण मंडळाने पैठण धरणातील पाणी तपासणी नंतर दिला होता हे अनेकांच्या स्मरणात असेल.कोपरगावात गोदावरी नदीतील मासे मृत्युमुखी पडले असल्याचे सप्रमाण यापूर्वी शिवसेनेचे कार्यकर्ते व माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सिद्ध केले आहे.त्यामुळे पर्यावरणवादी व्यक्तींनी त्या विरोधात ओरड करण्यास प्रारंभ केला आहे.त्यात चूक आहे असे म्हणता येणार नाही.मात्र हिंदु जनजागृती समितीचा दावा एकदम खोटा ठरवता येणार नाही.वर्षभर पाणी दूषित करणारे महाकाय कारखाने मोकाट सोडून द्यायचे व एक दिवस गणेश मूर्ती विसर्जन करण्यास विरोध करणे म्हणजे दरवाजा मोकळा आणि मोरीस बोळा घालण्याचा हा प्रकार म्हटले पाहिजे ते चुकीचे म्हणता येणार नाही.कोपरगाव नगरपरिषद आपल्या खंदक नाल्यामार्फत अख्खे शहराचे पाणी गोदावरी नदित सोडून देते तेव्हा गोदावरी प्रदूषित होत नाही का ? ते कमी कि काय गोवंश हत्या व त्याचा रक्तपात हा आधी गटारी आणि त्यानंतर थेट नाल्या मार्फत गोदावरीत जातो हा प्रश्न यापूर्वी ऐरणीवर आला होता.त्यावेळी श्री क्षेत्र सराला बेटांचे महंत रामगिरीजी महाराज यांनी त्यात उडी घेतली होती.त्याला फार दिवस झाले नाही.हा सवाल एकदम दुर्लक्षित करण्याजोगा नाही हे वास्तव आहे.अशीच वादाची घटना वर्तमानात कोपरगावात घडली आहे.या ठिकाणी गोदावरी नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास दोन तट पडले आहे.यात पर्यावरणवादी कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे यांनी या मूर्तींचे विसर्जन नदीत न करता ते स्वतंत्र करावे असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे जलप्रदूषण होत असल्याचा त्यांचा दावा आहे.तर या विरुद्ध हिंदू जनजागृती समितीने प्रतिदावा केला आहे.त्यामुळे प्रशासना समोर नेमकी काय भूमिका घ्यावी असा पेच तयार झाला आहे.

गोदावरी नदी प्रदूषणाबाबत थेट त्र्यंबकेश्वर पासून ते थेट पैठण पर्यंत राज्य शासनास मोठे तर कोपरगाव बाबत नगरपरिषद आणि त्यांच्या प्रशासनास काम करावे लागणार आहे.शहरातील दूषित पाणी गोदावरी नदीत थेट सोडण्याऐवजी त्याचे शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प लवकरच राबवावा लागणार हे हे उघड आहे.त्यातून उत्पन्नाचा मार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवून दिला आहे.

दरम्यान हिँदू जनजागृती समितीने प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”शहरात व नदी काठी अनेक कारखाने प्रदूषण करुन थेट नदीत पाणी सोडून नदीचा जल स्तर प्रदूषित करतात त्यावेळी कोणीही ओरड करत नाही मात्र वर्षातून एक वेळ मूर्ती विसर्जन केल्यानेच जास्त प्रदूषण कसे असा सवाल त्यांनी केला आहे.अनेक ठिकाणी नगर पालिका प्रशासन मुर्ती संकलन करून त्यावर जेसीबी यंत्र फिरवतात.गणेश मूर्ती कचऱ्याच्या गाडीतून नेण्यात येतात परिणामस्वरूप विटंबना हि कशी खपवून घेतली जाते ? श्री गणेश मूर्तीची होणारी विटंबना थांबविण्यासाठी तसेच नैसर्गिक रंग वापरून तयार केलेली व पाण्यात विरघळणारी शाडुच्या मातीच्या मूर्ती वापरण्यासाठी शासनाने नागरीकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीने तहसीलदार,मुख्याधिकारी,पोलीस निरीक्षक कोपरगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.

दरम्यान या नदी प्रदूषणाबाबत थेट त्र्यंबकेश्वर पासून ते थेट पैठण पर्यंत राज्य शासनास मोठे तर कोपरगाव बाबत नगरपरिषद आणि त्यांच्या प्रशासनास काम करावे लागणार आहे.शहरातील दूषित पाणी गोदावरी नदीत थेट सोडण्याऐवजी त्याचे शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प लवकरच राबवावा लागणार हे हे उघड आहे.त्यातून उत्पन्नाचा मार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवून दिला आहे.मात्र यावर ना आजी-माजी नगराध्यक्ष बोलणार ना नगरसेवक.वर्तमानात सगळा भोंगळ कारभार आहे.कोपरगावातील सत्ताधारी व विरोधी भीष्माचार्य तथा राजकीय नेते यावर काहीही बोलणार नाही ते का बोलत नाही हे मतदारांना माहिती आहे.आमच्याकडून वदवून घेण्याची गरज नाही.वर्तमानात शहरात आणि तालुक्यात त्यासाठी राजकीय व सामाजिक दबाव गट नाही ढाकणे यांची केवळ सुरुवात आहे.त्यांना जनतेची साथ लागणार आहे.तरच हा प्रश्न धसास लागणार आहे.हे वास्तव नाकारता येत नाही.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close