जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

गोदावरी कालवे पूर्ण क्षमतेने चालवा अन्यथा आंदोलन-…या कार्यकर्त्यांचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव,राहाता तालुक्यांना शेती सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या गोदावरी कालव्यांचे पूर पाणी पूर्ण क्षमतेने चालवा अन्यथा आपण नाशिक येथून जलदिंडी काढून जलसंपदा विभागाचा निषेध करू असा इशारा माहिती अधिकार संजय काळे यांनी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

“कोपरगावचे पगारी व पेन्शनर लोकप्रतिनिधींना मुबलक व मोफत पाणी मिळत असेल.म्हणून ते बोलत नसतील.परंतु दोन्ही कालवे गोदावरी नदी प्रवाही आहे तोपर्यंत प्रत्यक्ष व कागदोपत्री पुर्ण क्षमतेने चाललेच पाहीजे.पूर पाणी कालखंडात हे पाणी शेतकरी,नदी,नाले,ओढे यांना मोफत मिळालेच पाहिजे”-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते.

गोदावरी डावा कालवा पुर्ण क्षमतेने म्हणजे ३०० क्युसेकने चालविणे गरजेचे आहे तर गोदावरी उजवा कालवा ५०० क्युसेकने चालु ठेवणे गरजेचे आहे.मात्र जलसंपदा विभाग हे कालवे पूर्ण क्षमतेने चालवत नाही.ते का चालवत नाही कोणत्या राजकीय दबावात काम करतात ते समजायला मार्ग नाही मात्र हि वस्तुस्थिती आहे हे कोणीही शेतकरी नाकारणार नाही.

त्यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”प्रत्यक्षात कालवे आपल्या आश्वासन प्रमाणे चालु आहे पण कागदोपत्री आपण उजवा कालवा २०० क्युसेक व डावा कालवा १०० क्युसेकने दाखवत आहेत. ते असे वर्तन का करत आहे हा खरा प्रश्न आहे.हे कालवे पूर पाण्याच्या काळात कागदोपत्री देखील ५०० व ३०० क्युसेकनेच दाखवले पाहीजे.जलसंपदा विभाग तसेच कोपरगाव व राहाता तालुक्यातील नेते संगनमताने हे तालुके पाऊस कमी पडूनही पाणी वापरत नाही हे सिध्द करु पाहात आहे का ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.राजकीय नेत्यांची व जलसंपदा प्रशासनाची हि वर्तणूक खेदजनक आहे.
जलसंपदा विभागाची रिक्त पदे भरत नाही.जे अधिकारी आहेत ते शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी सात नंबर भरत नाही.खरीपात,रब्बीत अथवा उन्हाळ्यात पाणी वापरत नाही.त्यांना पाण्याची गरज नाही.त्यामुळे गोदावरी डावा व उजवा कालवा शेती साठी कायमचा बंद करण्याचे षडयंत्र करीत असल्याचे म्हणण्यास जागा आहे.
कोपरगावचे पगारी व पेन्शनर यांना मुबलक व मोफत पाणी मिळत असेल.म्हणून ते बोलत नसतील.परंतु दोन्ही कालवे गोदावरी नदी प्रवाही आहे तोपर्यंत प्रत्यक्ष व कागदोपत्री पुर्ण क्षमतेने चाललेच पाहीजे.पूर पाणी कालखंडात हे पाणी शेतकरी,नदी,नाले,ओढे यांना मोफत मिळालेच पाहिजे.
आत्ता फक्त कोपरगाव येथे जलदिंडी काढून सत्याग्रह केला पण जर आपण प्रत्यक्ष व कागदोपत्री पुर्ण क्षमतेने दोन्ही कालवे चालवले नाही तर माझी जलदिंडी नाशिक रोड पासून ते आपल्या कार्यालयात पायी येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोपरगाव व राहाता तालुक्यात पाऊस अत्यल्प पडलेला आहे.पण पिकांना आज पाण्याची गरज नाही.पूर पाण्याच्या कालखंडात व प्रत्यक्ष व कागदोपत्री समुद्रात पाणी पाठवण्यापेक्षा दोन्ही कालव्यांना पूर्ण क्षमतेने प्रत्यक्ष व कागदोपत्री पाणी चालु ठेवावे.
पाच दिवस रोज आपले अहवाल व कालवे तपासले जातील.आपली मागणी मान्य न झाल्यास आपण जलदिंडी काढून आपल्या आंदोलनात्मक सत्कार करायला येणार असल्याचे सुतोवाच संजय काळे यांनी केले असून हीच आपली नोटीस समजावी असे आवाहन जलसंपदा विभागास त्यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close