जलसंपदा विभाग
निळवंडे कालव्यांच्या कामाला आघाडी सरकारने निधी दिला-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तब्बल ५२ वर्ष रखडलेल्या निळवंडे कालव्यांच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असून हे पाणी अधिकाऱ्यांनी लवकरच दुष्काळी शेतकऱ्यांना पोहचवावे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“निळवंडे कालवा कृती समितीने हा ५२ वर्षांपासून प्रलंबित असलेला कालव्यांचा उच्च न्यायालयातील लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेला आहे.व अकोले तालुक्यासह अन्यत्र प्रलंबित असलेले कालवे सुरु होण्यासाठी सरकारने न्यायालयात दिलेले प्रतिज्ञा पत्र उपस्थितांना दाखवले आहे.कालवा समितीने लाठ्या काठ्या खाऊन हा लढा सुरु ठेवला आहे”-रुपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारच्या मनसुब्यावर पाणी फेरले असून राज्य निवडणूक आयोगाने महापालिका,नगर परिषदा,जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु केली आहे.यासंदर्भात आयोगाने आयुक्तांसाठी आदेश जारी केले आहेत.त्यामुळे मतदार याद्या,प्रभाग रचना सुरू झाली आहे.त्यामुळे आता राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते कामाला लागले आहे.आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आपल्या बैठका गावोगाव सुरु केल्या आहेत.राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे निळवंडे कालवा कामांची आढावा बैठक नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे,सहाय्यक अभियंता विवेक लव्हाट,कनिष्ठ अभियंता निखिल आदिक,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,राष्ट्रवादी काँग्रेसचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ,नानासाहेब शेळके,ज्ञानेश्वर वर्पे,गंगाधर गमे,उत्तम घोरपडे,सुरेश वाघ,दिपक वाघ,शिवाजीराव वाघ,अण्णासाहेब कोते,सुरेश लहारे,मुरलीधर शेळके,माजी सरपंच जालींदर लांडे,सुभाष निर्मळ,शंकरराव लहारे,अनिल कोते,साहेबराव आदमाने,अनिल रक्टे,अंजाबापू रक्टे,बाबुराव थोरात,प्रभाकर गुंजाळ,बाबासाहेब गुंजाळ,रावसाहेब कोल्हे,किसन पाडेकर,लक्ष्मण थोरात तसेच वाकडी,धनगरवाडी,चितळी व दिघी निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पुच्छपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे” हि शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.लाभधारक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या अशा अनेक प्रश्नांची अधिकाऱ्यांनी नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी.उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून सर्व लाभधारक क्षेत्राला पाणी मिळावे यासाठी पाण्याची मोठी बचत करावी लागणार आहे.त्यामुळे कालव्याचे अस्तरीकरण व बंदिस्त नलिका वितरण व्यवस्था देखील करावी लागेल त्याची मानसिकता शेतकऱ्यांनी आत्ता पासूनच करावी.१९७० पासून निळवंडे कालव्यांची कामे सुरु असून तिसऱ्या पिढीला देखील निळवंडेचे पाणी पहायला मिळाले नव्हते.मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून निळवंडे प्रकल्पाला जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी आजपर्यंत १०५६ कोटी निधी दिला आहे.निळवंडे कालव्यांच्या कामांना गती देण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयातील व सर्वोच्च न्यायालयातील व रस्त्यावरील लढा दिला आहे.सदस्य असलेल्या मा.खा.शंकरराव काळे,माजी आ.अशोकराव काळे यांनी देखील विरोधी पक्षाचा आमदार असतांना निळवंडेच्या कामाला गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.माजी खा.प्रसाद तनपुरे,ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे,खा.सदाशिव लोखंडे या सर्वांचे देखील निळवंडे कालवे तातडीने पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने माझे देखील प्रयत्न राहणार असून लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी घेवून जायचे असल्याचे शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक शिवाजीराव वाघ यांनी केले आहे.त्यावेळी कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी यावेळी उच्च न्यायालयातील लढा सर्वोच्च न्यायालयातील लढा सविस्तर विशद केला आहे.व अकोले तालुक्यात व अन्यत्र बावन्न वर्ष प्रलंबित असलेले कालवे सुरु होण्यासाठी सरकारने न्यायालयात दिलेले प्रतिज्ञा पत्र उपस्थितांना दाखवले आहे.कालवा समितीने लाठ्या काठ्या खाऊन हा लढा सुरु ठेवला असल्याचे सांगून आगामी काळातही हा लढा सुरूच राहील असे प्रातिपादन केले आहे.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश वाघ यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार जालिंदर लांडगे यांनी मानले आहे.सदर प्रसंगी पाट पाणी समितीचे माजी अध्यक्ष गंगाधर गमे यांनी या प्रकल्पात अडथळा आणणाऱ्या काही उपस्थित नागरिकांच्या उपस्थितीस हरकत घेतली होती त्याला काहींची मध्यस्ती करून शांत केले आहे.उपस्थित प्रश्नांना उपास्थित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली आहेत.
सदर प्रसंगी राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील सुरु असलेल्या निळवंडे कालव्यांच्या कामाची आ.काळे यांनी पाहणी केली.पुच्छ तलाव कुठे बांधला जाणार या बाबत सविस्तर माहिती घेवून व स्वत: कामाची पाहणी केली आहे.