जलसंपदा विभाग
टंचाई दूर करण्यासाठी…या तालुक्यातील पाझर तलाव तातडीने भरा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येकडील निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील अवर्षण ग्रस्त जवळके,धोंडेवाडीसह बहादरपूर,अंजनापूर वेस-सोयगाव,शहापूर,बहादराबाद आदी १३ गावातील पाझर तलाव आगामी काळातील चारा व पाणी टंचाई दुर करण्यासाठी तातडीने दूर करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब कोळेकर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान वर्तमानात मोठा दुष्काळ आहे.शेतकऱ्यांना रब्बी पिकांना व पिण्यास पाणी शिल्लक नाही.चारा पिकांना पाणी उपलब्ध नाही.त्यामुळे आत्ताच माय लेकराला धरेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.दुसऱ्या आवर्तनात किमान मनेगाव,रांजणगाव देशमुख पूर्व व भाग,काकडी,मल्हारवाडी,वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,चिंचोली,देवकौठे,सायाळे,मलढोण,दुशिंगपूर,बहादराबाद,शहापूर,वारेगाव आदीसह पुंच्छ भागातील वाकडी,चितळी,धनगरवाडी,दिघी आदी तलावात निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडलेले नाही.अद्याप या लढ्यात योगदान देणारी गावे व कार्यकर्ते,शेतकरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे.त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची वेळीच दखल घेऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निळवंडे डावा कालवा संपूर्ण लाभक्षेत्रातील किमान पाझर तलाव व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून पिण्याच्या पाण्यासाठी व चारा पिकांना वंचित गावांना तातडीने पाणी उपलब्ध करणे व सर्व बंधारे भरे पर्यंत आवर्तन बंद करू नये या परिसरातील मनेगाव,काकडी,रांजणगाव देशमुख,वाकडी,चितळी,धनगरवाडी,दिघी,मल्हारवाडी,वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,देवकौठे,सायाळे,मलढोण,दुशिंगपूर,शहापूर,बहादराबाद,पुंच्छ भागातील वाकडी,धनगरवाडी आदी पाझर तलावात व के.टी.वेअर मध्ये निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडणे गरजेचे आहे.
दरम्यान अर्धवट निळवंडे उजवा कालवा तातडीने पूर्ण करून प्रथम चाचणी पूर्ण करण्यासह अस्तरीकरण निविदा प्रसिद्ध कराव्या,निळवंडे मुख्य वितरण व्यवस्थेच्या निविदा तातडीने प्रसिद्ध करून ते पूर्ण करून पुंछ दुष्काळी भागात पाणी पुरवठा करा,निळवंडे डावा कालवा अकोले तालुक्यातील अस्तरीकरण प्रथम करून नंतर बाकी अन्य कालव्याच्या अस्तरीकरण निविदेनुसार तातडीने पूर्ण करा,निळवंडे डाव्या कालव्यावर प्रमुख नद्या व नाले आदींवर एस्केप,व एच.आर.तातडीने पूर्ण करा.याबाबत आगामी ३० नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या सुनावणीत उच्च न्यायालयाचे लक्ष वेधणार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे.वरील मागण्यांचा जलसंपदा विभागाने तातडीने विचार करून उजवा कालवा तातडीने पूर्ण करून डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाझर तलाव तातडीने भरून द्यावे असेही निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांनी शेवटी केली आहे.
दरम्यान सदर निवेदनाच्या प्रति राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस,गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळ संभाजीनगर येथील कार्यकारी संचालक,जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता प्रशांत मिसाळ,कोपरगावचे आ.आशुतोष काळे,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे,ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे,शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर,कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी आदींना दिल्या आहेत.
सदर निवेदनावर जवळके ग्रामपंचायत सरपंच सारिका विजय थोरात,बहादरपूर ग्रामपंचायत सरपंच गोपीनाथ पाराजी रहाणे,अंजनापूर सरपंच कविता अशोक गव्हाणे,बहादराबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी विक्रम पाचोरे,शहापूर सरपंच योगिता रमेश डांगे,धोंडेवाडीचे उपसरपंच रोहिणी राजेंद्र नेहे आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान आज कोपरगाव पंचायत समितीत आज आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली असून त्यात त्यांना सदर निवेदन देऊन मागणी केली आहे.त्यात गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांचे या प्रकरणी पाणी सोडण्यासाठी स्थळ पाहणी करण्यासाठी लक्ष वेधून घेण्यात आले असता त्यांनी उद्या दि.२५ नोव्हेंबर रोजी येणार असल्याचे आ.काळे यांचे समोर आश्वासन दिले आहे.