जयंती,पुण्यतिथी अभिवादन
संभाजी महाराजानी मुघलांशी कडवी झुंज दिली-आ.काळे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते.तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते.राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते.त्यामुळे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांनी सलग आठ वर्ष मूघलांशी कडवी झुंज दिली असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांना महत्प्रयासाने छत्रपती पदवी आणि राज्यधिकार मिळाला होता.व त्यांनी आगामी काळातील सलग आठ वर्षाच्या लढायांनी सिद्ध करून दाखवला व दक्षिणेत आलेल्या औरंगजेबास सळो की पळो करून सॊडले होते म्हणूनच त्यांना स्वराज्य रक्षक म्हणून ओळखले जाते”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती कोपरगाव यांच्या वतीने श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अवधूत गांधी आळंदीकर यांच्या भक्ती-शक्ती संगम ह्या भारुड व पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी आ.काळे यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी महंत कैलासनंदगिरी महाराज,श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी गटनेते विरेन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,संदीप पगारे,रमेश गवळी,कृष्णा आढाव,फकीर कुरेशी,राजेंद्र वाकचौरे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,बाळासाहेब रुईकर,इम्तियाज अत्तार,ऋषीकेश खैरनार,महेश उदावंत,राजेंद्र आभाळे,सोमनाथ आढाव,विशाल निकम,रहेमान कुरेशी,शुभम लासुरे, शिवाजी कुऱ्हाडे,सागर लकारे,रविंद्र चव्हाण,ओंकार वढणे,ऋतुराज काळे,रितेश राऊत, प्रसाद रुईकर आदी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”संभाजी महाराज यांना मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे वाटले होते.मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांना महत्प्रयासाने छत्रपती पदवी आणि राज्यधिकार मिळाला होता.व त्यांनी आगामी काळातील सलग आठ वर्षाच्या लढायांनी सिद्ध करून दाखवला व दक्षिणेत आलेल्या औरंगजेबास सळो की पळो करून सॊडले होते.अखेर त्यांना विश्वासघाताने पकडण्याचा पर्यंत करावा लागला होता.असे त्यांनी शेवटी सांगितले आहे.