जयंती,पुण्यतिथी अभिवादन
क्रांतिकारक भांगरे शहीद दिनानिमित्त कोपरगावात अभिवादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे शहीद दिनानिमित्त कोपरगाव शहरात आदिवासी महादेव कोळी युवक संघाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले आहे.
बंड उभारल्यानंतर राघोजीने ‘आपण शेतकरी,गरीबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत’,अशी भूमिका जाहीर केली होती.कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता.टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे.शौर्य व प्रमाणिक नीतीमत्ता याला धार्मिकपणाची जोड़ त्याने दिली.महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती.भीमाशंकर,वज्रेश्वरी,त्रंबकेश्वर,नाशिक,पंढरपूर येथे बंडाच्या काळात ते देवदर्शनाला गेले होते.त्या ठिकाणी अटक करून नंतर खटला चालवून त्यांना फाशी दिली गेली.
राघोजींचा जन्म महादेव कोळी जमातीत झाला.मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या,वतनदाऱ्या काढल्या.परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला.इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला.सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरिब सावकार,वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले.कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले.त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली.
राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरु झाले.नोव्हेंबर इ.स.१८४४ ते मार्च इ.स.१८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते.बंड उभारल्यानंतर राघोजीने ‘आपण शेतकरी,गरीबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत’,अशी भूमिका जाहीर केली होती.कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता.टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे.शौर्य व प्रमाणिक नीतीमत्ता याला धार्मिकपणाची जोड़ त्याने दिली.महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती.भीमाशंकर,वज्रेश्वरी,त्रंबकेश्वर,नाशिक,पंढरपूर येथे बंडाच्या काळात ते देवदर्शनाला गेले होते.तेथे त्यांना पकडले.ठाण्यास नेले.राघोजी अत्यंत स्वाभिमानी होते.त्यांला इंग्रजी अधिकाऱ्यांनी वकील मिळू दिला नाही.त्यानीं स्वतःच बाजू मांडली.दि.२ मे १८४८ रोजी त्यांना फाशी देण्यात आले.त्यांची पुण्यतिथी आजही मोठ्या आदराने साजरी केली जाते.
त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आले त्या वेळी आदिवासी महादेव कोळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित चंद्रकांत आगलावे,संघाचे मार्गदर्शक मनोहर लक्ष्मणराव शिंदे,शरद शिंदे,बाळासाहेब भांगरे,सुनील पोरे,गोविंद आढळ,मधुकर लंगोटे,नारायण चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.