जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगाव तालुक्यातील…या गावात डॉ.आंबेडकर जयंती संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.यंदा जयंतीनिमीत्त ठिकठिकाणी तयारी सुरू असून,देशाचे घटनाकार म्हणून भीमराव आंबेडकर अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं.
कोपरगाव तालुक्यातील काकडी हद्दीत नूकतीच सायंकाळी सात वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.त्या निमित्त आकर्षक विद्युत आकर्षक रोषणाईसह पहिल्या दिवशी रक्तदान शिबिर,दुसऱ्या दिवशी सा.रे.ग.म.प.यांचा ऑर्केस्ट्रा तसेच आज सायंकाळी महामानवाची डॉ.आंबेडकर प्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत मिरवणूक संपन्न झाली आहे.काकडी-मल्हारवाडी येथील डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले आहे.