जयंती,पुण्यतिथी अभिवादन
माजी खा.बडदे यांची जयंती साजरी

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
माजी ख.भिमराव बडदे यांच्या ७८ व्या जयंती निमित्त कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात “सैनिक सेवा ओळख आणि शिस्त” या विषयावर आत्मा मालिक मिलिटरी व एनसीसी प्रशिक्षण प्रमुख साईनाथ वर्पे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

प्रारंभी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती,लोकनेते माजी खासदार भिमराव नाना बडदे यांची जयंती निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
माजी खा.स्व.भीमराव विष्णूजी बडदे यांचा जन्म ऑगस्ट ०१ इ.स.१९४७ रोजी झाला होता.हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून इ.स.१९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून आपल्या वकृत्व आणि भाजप निष्ठेवर लोकसभेवर निवडून गेले होते.मात्र त्या लोकसभेचा कालावधी अल्पावधीचा ठरला होता.तरीही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.त्यांची जयंती उत्सव नुकताच माजी खा.ॲड.कै. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण,महाराष्ट्र प्रांतचे सदस्य,श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.त्यावेळी आत्मा मालिक मिलिटरी व एनसीसी प्रशिक्षण प्रमुख साईनाथ वर्पे यांनी मार्गदर्शन केले आहे.

त्यावेळी वर्पे म्हणाले की,”देशाप्रती प्रत्येकाने अभिमान बाळगून नेहमी “भारत माता की जय” घोषणा देत असतो.परंतू या जय घोषाला साजेसे कार्य आपणाकडून होते की नाही याचे आत्मपरीक्षण ज्याने-त्याने आपापल्या परीने करणे देशहितासाठी आवश्यक आहे.
सदर कार्यक्रमास माजी खा.प्रदिप रावत,कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कूल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,राष्ट्रसेविका नानीसाहेब बडदे,मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, स्वच्छतादूत सुशांत घोडके,लोकतंत्रसेनानी लताताई चौधरी,स्वातीताई मुळे,मुकुंद कालकुंद्री,सतिश चव्हाण,देवेंद्र कालकुंद्री, ज्येष्ठ नागरिक मंचाचे गणपत विधाटे,उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभीम उल्हारे, राजश्री बोरावके, अतुल कोताडे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धर्मयोध्दा माजी खासदार ॲड.कै.भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण,महाराष्ट्र प्रांतचे सदस्य,श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद,श्रीमान गोकुळचंदजी परिवाराने परिश्रम घेतले.सुत्रसंचालन दिगंबर देसाई यांनी तर आभार सुशांत घोडके यांनी मानले आहे.