जाहिरात-9423439946
ग्रामविकास

तालुका मतदार संघाच्या विकासासाठी पाठींब्याची गरज-..या आमदारांची अपॆक्षा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु असला तरी अद्याप बऱ्याच समस्या बाकी असल्याने त्या सोडविण्यासाठी मतदार संघातील मतदारांच्या पाठींब्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

  

खोटी आश्वासन द्यायची हे आमच्या रक्तात नाही.जी कामे होवू शकतात तीच आश्वासन द्यायची व ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावायचे.चाळीस वर्षात ज्यांच्याकडे सत्ता होती.राज्यात व केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार होते मात्र त्या चाळीस वर्षात होवू शकला नाही एवढा विकास या चार वर्षात झाला आहे.

कोपरगाव मतदार संघातील बहादरपूर येथे महिला बचत गट भवन इमारत भुमिपूजन जलसंधारण अंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन,बहादरपूर-जवळके रस्त्यावरील पुलाच्या नूतनीकरणासह विविध विकास कामांचे  भूमीपूजन व उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी बहादरपूर सरपंच गोपीनाथ रहाणे,उपसरपंच रामनाथ पाडेकर,साहेबराव रहाणे,दत्तात्रय खकाळे, शिवाजी रहाणे,प्रशांत रहाणे,भाऊसाहेब रहाणे,नानासाहेब पाडेकर,गोपीनाथ खकाळे,आप्पासाहेब पाडेकर, साईनाथ रहाणे,बाबासाहेब रहाणे,रामनाथ रहाणे,रंगनाथ गव्हाणे,साहेबराव खकाळे,आण्णा रहाणे,कचेश्वर रहाणे, संदीप जोरवेकर,विलास पाडेकर,भिकचंद रहाणे,बाळासाहेब रहाणे,बाळासाहेब पाडेकर,नानासाहेब पाडेकर,वैभव सोनवणे,अमोल पाडेकर,सोमनाथ रहाणे,साईराम रहाणे,विजय कोटकर,बाळासाहेब रहाणे,चित्राताई रहाणे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”माजी आ.अशोक काळे यांनी देखील विरोधी पक्षाचे आमदार असतांना आपल्या वैयक्तिक हितसंबंधातून मतदार संघाचा विकास केला आहे.त्या चाळीस वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी मतदार संघाच्या विकासासाठी या सडे चार वर्षात आणू शकलो याचे समाधान आहे.परंतु आपल्याला आजूनही विकासाचा पल्ला गाठायचा आहे अजून विकास करायचा आहे.त्यासाठी यापुढील काळातही मतदार संघाला विकासाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी आपले पाठबळ आवश्यक असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

   सदर प्रसंगी प्रास्तविक बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी केले तर मनोगत पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब रहाणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर सूत्रसंचालन बाळासाहेब ची.रहाणे यांनी मानले तर आभार शिवाजी चं.रहाणे यांनी मानले आहे.त्यावेळी विकास कामाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close