क्रीडा विभाग
कोपरगाव नगरपालिका हद्दीत मुलांना खेळायला मैदान कधी-माजी नगराध्यक्ष

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उन्हाळ्याच्यां सर्व शाळा व महाविद्यालय यांना नुकत्याच सुट्ट्या लागल्या आहेत.परंतु वेळ कसा घालवायचा हा प्रश्न कोपरगाव शहरातील पालक आणि त्यांच्या मुलांना पडला असून त्यासाठी पालिका हि सोय कधी करणार असा सवाल कोपरगाव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिका प्रशासनास विचारला आहे.
“मुलांमध्ये खेळाडू वृत्ती तयार होण्यासाठी खेळाडूंना अंत:प्रेरणा मिळण्यासाठी या पायाभूत सुविधा उपयोगी पडत असतात.त्यातून त्यांची शारीरिक वाढ चांगली होते,यासाठी कोपरगाव शहरांमध्ये महिला व पुरुष यांचे साठी एक एकत्रित क्रीडा मैदान,दुसरे फक्त महिलांसाठी,तिसरे पुरुषांसाठी असे तीन ते चार मोठे मैदाने क्रीडा प्रेमींना नवीन अद्यावत सर्व सोयींनीयुक्त केले पाहिजे”-मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगर परिषद.
राज्यातील शाळा महाविद्यालयास सुट्ट्या लागल्या असून वर्तमानात कोपरगाव शहरातील पालक आणि विद्यार्थी यांना आपला वेळ कसा घालवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यासाठी शहरातील प्रशासनाने यावर आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.मात्र या पातळीवर शुकशुकाट असल्याने शहरातील नागरिकांना आपला वेळ घालविण्यासाठी विरंगुळा ठिकाणे शिल्लक राहिली नाही.त्यामुळे या पातळीवर आता पर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने लक्ष घातले नाही त्यामुळे आगामी काळात आता प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून होत आहे.या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी लक्ष वेध केला आहे त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मुलांमध्ये खेळाडू वृत्ती तयार होण्यासाठी खेळाडूंना अंत:प्रेरणा मिळण्यासाठी या पायाभूत सुविधा उपयोगी पडत असतात.त्यातून त्यांची शारीरिक वाढ चांगली होते,यासाठी कोपरगाव शहरांमध्ये महिला व पुरुष यांचे साठी एक एकत्रित क्रीडा मैदान,दुसरे फक्त महिलांसाठी,तिसरे पुरुषांसाठी असे तीन ते चार मोठे मैदाने क्रीडा प्रेमींना नवीन अद्यावत सर्व सोयींनीयुक्त केले पाहिजे.त्या भोवती ज्येष्ठ नागरिकांना व नागरिकांना चालण्यासाठी स्वतंत्र चालण्याच्या पायवाटा तसेच मैदानाच्या कडेला छोटे-छोटे क्रीडा साहित्य सहज प्राप्त होईल व मुलांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण होईल आणि ते त्यामुळें सुदृढ व निरोगी राहतील.तसेच त्या क्रीडांगणात खो-खो,कबड्डी सुविधा,तालीम आदी सोयी गरजेच्या आहेत.त्याकडेला अन्य छोट्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायासाठी सोय केल्यास त्यांना सहज रोजगार प्राप्त होईल अशी अपेक्षा माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी व्यक्त केली आहे.त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि मागणी केल्याने प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून आहे.