पुरस्कार,गौरव
कोपरगाव तालुक्यातील…या शिक्षिका सेवानिवृत्त

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनिता थोरात या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या असून त्यानिमित्त त्यांचा त्यांच्या हितचिंतकांनी सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
“सुनिता थोरात यांनी ज्या ज्या गावात शिक्षका म्हणून सेवा बजावली त्या सर्व गावातील ग्रामस्थ पदाधिकारी आज कार्यक्रमास उपस्थित आहेत त्यावरून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते बालकांबरोबरच पालकांबरोबर निकोप संबंध ठेवणाऱ्या शिक्षकाला कधीच कुठलीच अडचण येत नाही”-हरिभाऊ शिंदे,संचालक,कर्मवीर शंकरराव काळे कारखाना.
जिल्हा प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनिता थोरात यांच्या सेवेची सुरुवात या शाळेतून झाली होती.त्या नंतर त्यांनी आपली सेवा आदी गावातील प्राथमिक शाळांत बजावली होती.त्या नंतर त्या नुकत्याच कोपरगाव ब्रँच मुर्शतपूर शाळेमधील ३७ वर्षांचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या आहेत.त्या निमित्त शाळेचे शिक्षक संघटना,ग्रामस्थ व हितचिंतक आदींनी सेवापुर्ती सोहळा कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात संपन्न केला आहे.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे,कर्मवीर कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे,मुर्शतपुर ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना दवंगे,माजी सरपंच संदीप उगले,दिलीप शिंदे,प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब देवरे, कोपरगांव माजी अध्यक्ष ज्ञानदेव रहाणे,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,केंद्रप्रमुख विद्या भोईर,राजेंद्र ढेपले,मुर्शतपुरचे ग्रामसेवक सुनिल रजपूत,ओ.टी.स्टाफ इन्चार्ज साईबाबा संस्थान सुपर हॉस्पिटल संगीता थोरात,ज्योती थोरात,ज्ञानदेव ससाणे आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना जिल्हा शिक्षक बँकेच्या संचालिका विद्युलता आढाव,बाबासाहेब खरात,शिक्षक समिती गुरुकुल मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक कानडे,बहुजन मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ज्ञानेश्वर माळवे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश गोरे यांनी केले तर शेवटी आभार ज्ञानदेव ससाणे यांनी मानले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश जोंधळे,रवींद्र सुपेकर,विनोद सोनवणे,जनार्दन भवरे,सुरेश गोरे,संजय खरात,कैलास वाघ,अशोक भालेराव,मारुती गायकवाड,राहुल ससाणे,व त्यांचे माजी विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.