जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

व्यापाऱ्यांनी व्यवसायासोबत मैदानावर उतरण्याची गरज-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

व्यापारी वेगवेगळ्या व्यवसायांद्वारा अहोरात्र कष्ट करून ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा देणारा समाजातील महत्त्वाचा घटक आहे.व्यवसाय करत असताना व्यवसायात होणारे चढ-उतार,नफा-तोटा हे त्याच्या मानसिकतेवर परिणाम करत असतात.त्यामुळे व्यापाऱ्यांनी मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम बनून स्वतःचे व आपल्या परिवाराचेही आरोग्य खेळण्यासाठी मैदानावर उतरून सांभाळले पाहिजे असे आवाहन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

  

दरम्यान या स्पर्धेत धारणगाव रोड संघाचा फलंदाज मल्हार टिळेकर याला मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाजाचा किताब देण्यात आला.त्याने अष्टपैलू कामगिरी करत ४ सामन्यांमध्ये १४३ धावा करत ४ फलंदाज बाद केले.उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब बस स्टॅन्ड परिसर संघाचा उत्कृष्ट गोलंदाज प्रतिक मोरे याने मिळविला आहे.यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आयोजित ‘व्यापारी प्रीमियर लीग २०२४’ कोपरगाव रेल्वे स्टेशन जवळील ‘टर्फ अल्फा’ क्रिडांगणावर कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे,लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष सुमित भट्टड,राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू अक्षय आव्हाड,कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब,उद्योगपती व माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर,समता पतसंस्थेचे संचालक गुलशन होडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली त्या वेळी ते बोलत होते.

     सदर प्रसंगी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,सचिव प्रदीप साखरे,तुलसीदास खुबाणी, महावीर सोनी,संतोष गंगवाल आदींसह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी,विविध शाखांचे अध्यक्ष,पदाधिकारी उपस्थित होते.


    अंतिम सामना कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा धारणगाव रोड व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा बाजार तळ या दोन संघांमध्ये खेळविण्यात आला होता.प्रथम फलंदाजी करताना धारणगाव संघाने ४ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात ५० धावांचे लक्ष्य बाजार तळ संघाला दिले होते.बाजार तळ संघाने विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना ४ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १४ धावा केल्या.धारणगाव रोड संघाने ३६ धावांनी विजय मिळवत ‘व्यापारी प्रीमियर लीग २०२४’ च्या करंडकावर नाव कोरले आहे.

    या विजयात धारणगाव रोड संघाचा फलंदाज मल्हार टिळेकर याला मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाजाचा किताब देण्यात आला.त्याने अष्टपैलू कामगिरी करत ४ सामन्यांमध्ये १४३ धावा करत ४ फलंदाज बाद केले.उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब बस स्टॅन्ड परिसर संघाचा उत्कृष्ट गोलंदाज प्रतिक मोरे याने मिळविला.त्याने आपल्या संघासाठी गोलदाजीत धावांची उत्कृष्ट सरासरी राखत ४ सामन्यात ८ फलंदाज बाद करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

     या प्रीमियर लीग मध्ये दोन गटांत कोपरगातील १०० च्यावर व्यापाऱ्यांनी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा बस स्टॅन्ड परिसर,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा कापड बाजार परिसर,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा येवला रोड,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा गोदाम गल्ली,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा मेन रोड,तालुका व्यापारी महासंघ शाखा भाजी मार्केट परिसर,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा गांधीनगर,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा धारणगाव रोड,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ शाखा बाजार तळ या ८ संघांनीं आपला सहभाग नोंदविला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close