कोपरगाव शहर वृत्त
साठवण तलावाच्या निमित्ताने नगरपरिषद निवडणूक बिगुल वाजवला !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेच्या नागरिकांचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडवला असून आगामी काळात इतर मागासवर्ग आरक्षणाचा विषय न्यायालयातून संपुष्टात येणार असून शहरातील नागरिकांनी आम्ही जे उमेदवार देऊ निवडून द्या असे आवाहन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी करून आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजवला असल्याचे मानले जात आहे.

माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी आ.आशुतोष काळे यांनी निवडणुकीत महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवणार असल्याचे जाहीर केले होते त्या प्रमाणे आपले आश्वासन दिले होते ते या तलावामुळे पूर्णत्वास जात असल्याचा दावा केला असला तरी ज्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ही योजना मंजुर झाली ज्यांचे सहकार्य लाभले ते माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व ज्यांनी समांतर पातळीवर केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करणारे व पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष वेधून घेणारे कार्यकर्ते राजेश मंटाला यांना दुर्लक्षित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी साठवण क्षमतेची महत्वपूर्ण कमतरता दुर करण्यासाठी महाराष्ट्र नगरोतथान महाभियान योजनेअंतर्गत येसगाव येथील
साठवण तलावाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा आज रविवार दि.११ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शुभारंभ आ.आशुतोष काळे व त्यांच्या धर्मपत्नी चैताली काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हे होते.
सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,शहराध्यक्ष सुनील गंगुले,माजी गटनेते डॉ.अजय गर्जे,विरेंन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,रमेश गवळी,राजेश ठोळे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,नवाज कुरेशी,अरविंद भन्साळी,सुधीर डागा,सुनील बंब,कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक अरुण चंद्रे,प्रवीण शिंदे,सतीश कृष्णांनी,अजित लोहाडे,संदीप रोहमारे,राहुल रोहमारे,सुनील फंड,किरण बिडवे,सुनील शिलेदार,सेनेचे माजी शहाराध्यक्ष भरत मोरे,लक्ष्मी कंट्रक्शनचे श्री पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,कोपरगाव शहराची साठवण क्षमता नसल्याने पाण्याचे हाल झाले आहे हे वास्तव आहे.पण यावर न बोलता नागरिकांना भरकटविण्यात आले होते.म्हणून हा प्रश्न आपण निवडून आल्यावर मनावर घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहे.निवडून आल्यावर दोन महिन्यात काम सुरू केले असून या जागेवरील पंधरा फूट माती उचलण्यास सुरुवात केली.काही लोकांना हे काम होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते.त्यासाठी नेते शरद पवार यांची मदत होऊन ५-६ कोटी वाचवले आहे.कमी जागेत साठवण क्षमता वाढविण्यासाठी हे कॉंक्रिटिकरण करण्याचा निर्णय घेतला होता.९५ कि. मी.वितरण व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.अनेक पाण्याच्या टाक्या बनवून झाल्या आहेत.व तलावाचे काम वेगाने सुरू झाले आहे.सदर काम ६-७ महिन्यात पूर्ण होऊन शहरास पाणी मिळविणे सोपे होईल.काही लोक या विरुद्ध न्यायालयात गेले काही लोकांना आंदोलने करायला लावले.नगरपालिका निवडणूक लवकर होईल ओ.बी.सी.आरक्षणाचा निकाल लवकर लागेल असा आशावाद व्यक्त केला व शहरातील अन्य विकासकामे मार्गी लावले आहे व लावणार आहे.मात्र आगामी काळात आम्ही जे उमेदवार देऊ त्यांना निवडून द्या असे आवाहन करून नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संदीप वर्पे यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना संदीप वर्पे यांनी कोपरगाव ची साठवण क्षमता १०८ कोटी होत असून त्यातून गरज भागवली जाणार असल्याचे सांगितले आहे.
सदर प्रसंगी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी निर्धारित वेळेत पूर्ण करू आश्वासन दिले आहे.
उपस्थितांसमोर ओमप्रकाश कोयटे यांनी गोदावरीच्या नदीतून ५० वर्षांपूर्वी नदीतून पाणी आणायचो असा दावा केला व नंतर लोखंडी टाकीतून क्षारयुक्त पाणी पुरवठा करण्यात येत होता.त्यावर त्यावेळी टीका झाली होती.बी.बी.सी.रेशनवर पाणी वाटपाची बातमी आली होती.आता न भूतो असे नूतन तलावाचे काम पूर्ण होत आहे ही समाधानाची बाब आहे.लोकांना केवळ पाणी येवो ते कोणतेही असो असे शेवटी कोयटे यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी चैताली काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर सूत्रसंचालन मंदार पहाडे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी
मानले आहे.