जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या गुंडांना धडा शिकवा-कोपरगावात मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणून शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या गुंडांना धडा शिकविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये केले आहे.

“कोपरगाव शहरातील गुंड कुठल्याही पक्षाचा किंवा जाती धर्माचा असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शहरासाठी आवश्यक असलेल्या छोट्या व्यावसायिकांसाठी ‘फेरीवाला झोन’ची त्वरित अंमलबजावणी करावी.रस्त्यांवर अडथळे करणारी अतिक्रमणे यांचा कठोरपणे बंदोबस्त करावा”-विजय वहाडणे,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत मोठया प्रमाणावर अवैध व्यावसायिक व टपरीधारक असून त्यांच्या मूळे कायदा सुव्यवस्था निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.मूळ भांडवल गुंतवणूक करून व व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढल्याचे निदर्शनास आलेले आहे.महिला भगिनींना शहरात वावरत असतांना मवाली प्रवृत्तीच्या त्रासाला सामोरे जावे लागते.दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असल्याचे दिसते.बदनामीच्या भीतीपोटी बऱ्याचदा अनेक मुली-महिला असे गैरप्रकार सहन करतात- तक्रारी द्यायची टाळाटाळ करतात.त्यामुळेच गुंड प्रवृत्तीच्या युवकांचे चाळे वाढतच चाललेले दिसतात.कुठल्या ना कुठल्या तरी पक्ष किंवा संघटनेचे संरक्षण घेऊन शहरात काही गुंड माजलेले आहेत.मतांच्या राजकारणामुळे त्यांच्या विरोधात जास्त कुणी बोलत नसल्याने शहरातील महिलांना असुरक्षित वाटत आहे.अशा अपप्रवृत्ती विरुद्ध बोलण्याचे धाडस न करता अनेकजण हे करा-ते करा सूचना देताना दिसत आहे.कुठलाही संघर्ष न करता,आंदोलन न करता,तुरुंगात न जाता नाही,नेत्यांविरुद्ध एकही शब्द न बोलता प्रसिद्धीच्या झोतात रहाणे हेच काहींचे मनोभावे चाललेले समाजकार्य आहे.एकमेकांविरुद्ध संदेश पाठविण्यातच आपण समाधान मानतो हेच घातक आहे.पण काही कार्यकर्ते मात्र अतिशय तळमळीने प्रश्न मांडतात,आंदोलने करतात हे फारच समाधानकारक आहे.

शहरातील गुंडगिरी-महिलांची छेडछाड आपल्याही घरापर्यंत येऊन पोहोचू शकते याचे भान आपल्या सर्वांनाच आले तर बरे होईल.अन्यथा गुंड अजून माजले तर शहर वासीयांना येथून पुढच्या काळात अवघड होईल.महिलांची-मुलींची छेडछाड करणारे,शहरात दादागिरी करणारे कुठल्याही जाती धर्माचे असोत,त्यांचा बंदोबस्त सर्वांनी करायला हवा.यात मतांचा अडथळा यायला नको.शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनास सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.अन्यथा वातावरण बिघडून लहान मोठ्या दुकानदारांचेच नुकसान होते.काही वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर हात उचलला गेल्याने आता शहरात बेकायदेशीर टपऱ्या वाढलेल्या दिसतात.आजही काही तथाकथित नंगट पुढारी फेरीवाले-हातगाडीवाले यांच्याकडून हप्ते वसूल करतात.त्यांच्याविरुद्ध कुणी बोलायलाही तयार नाही.

गुंड कुठल्याही पक्षाचा किंवा जाती धर्माचा असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शहरासाठी आवश्यक असलेल्या छोट्या व्यावसायिकांसाठी फेरीवाला झोन ची त्वरित अंमलबजावणी करावी.व त्रासदायक असलेली गुंडगिरी व रस्त्यांवर अडथळे करणारी अतिक्रमणे यांचा कठोरपणे बंदोबस्त करावा अशी मागणी त्यानीही शेवटी माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close