जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव तालुक्यातील…या बँके शाखेची खातेदारांना डोकेदुखी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विविध शासकीय योजना आणि या योजनांचे लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरीकांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती असल्यामुळे बहुतांशी नागरिक राष्ट्रीयकृत बँकेशी जोडले आहे.अशीच तालुक्यात पुर्व भागाला जोडणारी संजीवणी सेंट्रल बँक शाखा सध्या खातेदारांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

या शाखेत बचत खाते उघडण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करुन रितसर चलन भरुनही ज्यांचे कर्मचाऱ्यांशी चांगले हितसंबंध आहे.अशांना एक दिवसात खाते उघडून पासबुक दिले जाते मात्र अपरिचितांसाठी आठ दिवस खातेनंबर आणि पासबुक मिळणार नसल्याचे अगदी उर्मटपणाने सांगितले जाते हे विशेष !

संजीवनीं शाखेचा कारभार व्यवस्थापकांसह एक कॕशिअर दोन क्लर्क मार्फत चालतो.त्यात तेथील व्यवस्थापक दरवर्षीच बदलत असतात अनेक शेतकऱ्यांना या शाखेतुनच पतपुरवठा केला जात असला तरी कर्जमंजुरीसाठी व्यवस्थापकांपुढे हाथ जोडावे लागतात.प्रसंगी काही शेतकरी आर्थिक हितसंबंध जोपासुन कर्ज मंजूर करुन घेतल्याचे खाजगीत बोलतात.

या शाखेत बचत खाते उघडण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करुन रितसर चलन भरुनही ज्यांचे कर्मचाऱ्यांशी चांगले हितसंबंध आहे.अशांना एक दिवसात खाते उघडून पासबुक दिले जाते मात्र अपरिचितांसाठी आठ दिवस खातेनंबर आणि पासबुक मिळणार नसल्याचे अगदी उर्मटपणाने सांगितले जाते.तक्रार करण्यासाठी गेली तिन दिवसांपासुन तिथे व्यवस्थापकांची खुर्चीही कायम रिकामीच दिसत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा आणखी वाढीस लागला असुन आपली कैफीयत कुणाकडे मांडावी हा खातेदारांना पडलेला प्रश्न आहे.

बँकेत आर्थिक उलाढाल करणाऱ्या खातेदारांना शाखेत बसण्याची व्यवस्था नसुन या बँकेच्या आडमुठे कर्मचाऱ्यांनी आसनव्यवस्थेच्या खुर्च्या कोरोना काळापासून काऊंटरला चिपकुन ठेवल्या आहे.आसनव्यवस्था नसल्यामुळे संबंधित साहेब आणि कर्मचाऱ्यांकडून काम होईपर्यत खातेदारांना ताटकळत उभे रहावे लागते.दिवसेंदिवस खातेदारांना डोकेदुखी ठरणाऱ्या या शाखेतील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी लगाम लावावा अशी माफक अपेक्षा खातेदारांकडून केली जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close