जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या नेत्यांमुळे कोपरगाव शहर विकासाला चालना-दावा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांचा विश्वास सार्थ ठरवून दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीमुळे कोपरगाव शहरातील विकासाचे प्रश्न सुटले असून कोपरगाव शहराच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी एका प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

“आ.काळे यांनी सर्व प्रथम पाणी प्रश्न हाती घेवून पहिल्या तीनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाच्या कामाचा प्रश्न मार्गी लावतांना १३१.२४ कोटी निधी दिला आहे.त्याचबरोबर कोपरगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न देखील त्यांनी सोडविला असून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे तसेच शहर सुशोभीकरणाचे देखील काम प्रगतीपथावर आहे.त्यांनी ५ नंबर साठवण तलाव १३१.२४ कोटी व शहरासाठी १८ कोटी निधी दिला आहे”-सुनील गंगूले,अध्यक्ष,कोपरगाव शहर,राष्ट्रवादी काँग्रेस.

कोपरगाव शहराचा गेली अनके वर्ष धूळ आणि खड्ड्यानी पुरती वाट लागली होती.मात्र सन-२०१९च्या विधानसभा निवडणुकीत माजी आ.कोल्हे यांना धूळ चारल्यावर खऱ्या अर्थाने विकासाला दिशा मिळाली असल्याचा दावा गंगूले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटलं आहे की,”कोपरगाव तालुक्यातील विविध गावातून कोपरगाव शहरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे ते परत कोपरगाव शहरात फिरकत नव्हते व खरेदीसाठी दुसरा पर्याय निवडत होते.त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम कोपरगाव शहराच्या बाजारपेठेवर होवून बाजार पेठेतील आर्थिक उलाढाल थंडावली होती.त्यामुळे शहराचा दहा वर्षांपूर्वी पाणी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

त्यामुळे निवडून येताच आ.काळे यांनी सर्व प्रथम पाणी प्रश्न हाती घेवून पहिल्या तीनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाच्या कामाचा प्रश्न मार्गी लावतांना १३१.२४ कोटी निधी दिला आहे.त्याचबरोबर कोपरगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न देखील त्यांनी सोडविला असून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे तसेच शहर सुशोभीकरणाचे देखील काम प्रगतीपथावर आहे.त्यांनी ५ नंबर साठवण तलाव १३१.२४ कोटी व शहरासाठी १८ कोटी निधी दिला आहे.या निधीतून कोपरगाव शहराच्या विकासाला चालना देवून खऱ्या अर्थाने कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे.

कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांच्या जवळपास ११ कोटीच्या कामाच्या निविदा नुकत्याच प्रसिद्ध झाल्या असल्याचा त्यांनी दावा केला आहे.या निधीतून कोपरगाव शहरातील सर्वच प्रभागातील रस्त्यांची कामे होणार असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close