कोपरगाव शहर वृत्त
…या प्रतिष्ठाणचे कार्य कौतुकास्पद-आ.काळे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात राजमुद्रा प्रतिष्ठाण घेत असलेला पुढाकार व त्यांचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवद्गार आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.
“अडीअडचणीच्या वेळी समाजाला अपेक्षित असलेली मदत करतांना राजमुद्रा प्रतिष्ठान रक्तदान शिबीर,मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्याबरोबरच धार्मिक कार्यक्रम राबविण्यात देखील मागील २८ वर्षापासून नेहमी अग्रेसर असते.त्यांनी यावर्षीही सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याची परंपरा त्यांनी जपली आहे हि बाब कौतुकास्पद आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री सप्तशृंगी पालखी महोत्सवानिमित्त
साध्वी शारदानंदगीरी माताजी यांचे,”श्री नर्मदा महापुराण सोहळा”आयोजित करण्यात आला आहे.त्यावेळी त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राजमुद्रा प्रतिष्ठानचे वाल्मिक लहिरे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,अजीज शेख,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,डॉ.तुषार गलांडे,राहुल देवळालीकर,चंद्रशेखर म्हस्के,बाळासाहेब रुईकर,राजेंद्र खैरनार, संदीप कपिले,धनंजय कहार,राजेंद्र साबळे,मनोज नरोडे,शैलेश साबळे,मुकुंद भुतडा,विकि जोशी,विलास आव्हाड आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”अडीअडचणीच्या वेळी समाजाला अपेक्षित असलेली मदत करतांना रक्तदान शिबीर,मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्याबरोबरच धार्मिक कार्यक्रम राबविण्यात देखील मागील २८ वर्षापासून राजमुद्रा प्रतिष्ठान नेहमी अग्रेसर असते.त्यांनी यावर्षीही सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याची परंपरा त्यांनी जपली आहे.त्यामुळे सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यात देखील त्यांचा नेहमीच सहभाग निश्चितपणे कौतुकास पात्र असून अशा सामाजिक व धार्मिक कार्यास काळे परिवाराने नेहमीच सर्वोतोपरी मदत केली असून यापुढेही हि परंपरा अशीच सुरु राहणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.