जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोपरगाव तहसीलसह,नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन संपन्न झाला आहे.तहसील कार्यालयासमोर ध्वजारोहण तहसीलदार विजय बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

दरम्यान कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात संपन्न झालेल्या ध्वजारोहन कार्यक्रमाचे ध्वजारोहन पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी केले त्यावेळी माजी सभापती अर्जुन काळे यांचेसह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,संजीवनीचें माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,विजय वहाडणे,दिलीप दारूणकर,राजेंद्र सोनवणे,काँग्रेसचे सरचिटणीस नितीन शिंदे,दिलीप गायकवाड,बाळासाहेब आढाव,डॉ.अनिरुद्ध काळे,वैभव गिरमे,मंदार पहाडे,कृष्णा आढाव,अशोक आव्हाटे,राजेंद्र वाघचौरे,भाजप कोल्हे गटाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात,माजी नगरसेवक संजय जगताप,जनार्दन कदम,रमेश गवळी,मेहमूद सय्यद,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,प्रशांत वाबळे,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,फकीर कुरेशी,तुषार विध्वंस,कोपरगाव मुख्याधिकारी शांताराम गोसावी,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,वैभव आढाव,आदि मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी राष्ट्रध्वजास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,व शहर पोलीस ठाण्याचे वासुदेव देसले,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी आपल्या पोलीस दलासह दिली आहे.कोपरगाव येथील संजीवनी सैनिकी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी या वेळी आपल्या वतीने परेड सादर केली आहे.
सूत्रसंचालन गोरे सर यांनी केले आहे.
दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेने शालेय अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार अर्पण केले आहे.त्यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी,पालक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या ध्वराजारोहन कार्यक्रम या विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.त्यावेळी या विभागाचे अधिकारी बी.बी.गाडे,रविंद्र चौधरी,गौरव सोनवणे,श्री राऊत, बाळासाहेब औताडे व कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान कोपरगाव जलसंपदा विभागासह शहर आणि तालुक्यात विविध संस्थांत हा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close