जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

भिमशक्ती-शिवशक्ती एकत्र आल्यास देशाची सत्ता काबीज करण्याची ताकद-दिलासा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

भिमशक्ती शिवशक्ती एकत्र आल्यास राज्यासह देशाची सत्ता काबीज करण्याची ताकद या दोन्ही शक्तीत असल्याचे प्रतिपादन नगर उत्तर जिल्हा शिवसेना (उद्धव ठाकरे) प्रमुख राजेंद्र झावरे यांनी केले आहे.

कोपरगाव शहरात आगामी लोकसभा,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या व अन्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच एकत्र आलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे व बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या आघाडीचे विविध घोषणा देत उत्साहात स्वागत केले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे निमित्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज घोषणा करण्यात आली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.सध्याच्या राजकारणातील वाईट आणि परंपरा,चाली सुरू झाल्या आहेत.त्यावर आघात करण्यासाठी एकत्र आलो आहोत.प्रथम देशहित महत्त्वाचं असतं.अपप्रवृत्ती रोखण्यासाठी आपण एकत्र आल्याचा दावा करत हि आघाडी उघडली गेली आहे.त्याचे प्रतिसाद कोपरगाव सह राज्यात सर्वत्र उमटू लागले आहे.कोपरगाव शहरात जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,मुकुंद सिनगर,वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र संघटक शरद खरात,वंचितचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे,अनिल बनसोडे,संजय कोपरे,सचिन दाभाडे,चंद्रकांत खरात,शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,बाळासाहेब जाधव,कुक्कुशेठ सहानी,दिलीप सोनवणे,किरण खर्डे,इरफान शेख, बाळासाहेब साळुंके,राहुल देशपांडे,विजय जाधव,वर्षाताई शिंगाडे, अक्षिता आमले,अश्विनी होणे,शीतल चव्हाण,प्रफुल्ल शिंगाडे,विकास शर्मा,शेखर कोलते,सुनील कुंढारे,किरण अडांगळे,योगेश उशीर,वसीम शेख,सतीश खर्डे,विक्रांत झावरे यांच्यासह शिवसैनिक भिमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलता झावरे म्हणाले की,”आज अंत्यत आनंदाचा दिवस असुन हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते ते पूर्ण होत आहे.भिम शक्ती शिवशक्ती एकत्र यायला हवी,शिवसेना वंचित बहुजन आघाडी युतीमुळे खरोखर आनंद होत असुन लवकरच दोन्ही पक्षासाठी चांगले दिवस येतील.वंचित बहुजन आघाडी सोबत पुढील आंदोलने व निवडणुका सोबतच लढु असे त्यांनी शेवटी आश्वासित केले आहे.

सदर प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडियाल,वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र संघटक शरद खरात,वंचितचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे.

प्रारंभी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,घटनाकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुकुंद शिनगर यांनी केले तर स्वागत बाळासाहेब जाधव यांनी केले तर उपस्थींताचे आभार किरण खर्डे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close