जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावातील जवळचा ठरणारा…’तो’ रस्ता त्वरित करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर आणि खडकी रोड यांना जोडण्यात महत्वाची भूमिका निभावणारा रस्ता म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका निभावणारा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जवळचा ठरणारा तालुका पशुसंवर्धन दवाखान्याच्या उत्तरेस असलेला शंभर मीटरचा रस्ता कोपरगाव नगरपरिषदेने त्वरित करावा अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी नुकतीच केली आहे.

सदर नजीकचा रस्ता झाला तर नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याला किंवा येवला नाक्याला वळसा घालून जाण्याची गरज राहणार नाही.हा रस्ता केवळ अडीचशे ते तीनशे फूट आहे.मात्र वळसा घालून तो एक ते दीड कि.मी.पडत आहे.त्यामुळे अन्य रस्त्यावर काही कारण नसताना वळसा घालून रस्त्यावर गर्दी करण्याची गरज निर्माण होत आहे”-मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेने आपल्या अखेरच्या काळात विद्यार्थी आणि नागरिकांना जवळचा ठरणारा रस्ता म्हणून व साईबाबा कॉर्नर व गोदावरी पेट्रोल पंप यांना जोडणारा रस्ता मंजूर केला होता.सदर कामाची निविदा मंजूर होऊन सदर रस्त्याचे काम ठेकेदाराने दगड टाकून सुरु केले होते.मात्र गत एक वर्षांपासून या कामाला मुहूर्त लाभत नसून त्यास कोण आडवे आले आहे हे समजायला मार्ग नाही.या मार्गावरून महाविद्यालयीन तरुण मुले मुली,रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत जाणारे मुले,बाजार समितीत जाणारे शेतकरी आदींच्या सोईचां रास्ता होणे गरजेचे आहे.त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

सदर ठिकाणचे अतिक्रमण पालिकेने काढले आहे.मात्र हा रस्ता कधी पूर्ण होणार याबाबत नागरिकांत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.सदर रस्ता झाला तर नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याला किंवा येवला नाक्याला वळसा घालून जाण्याची गरज राहणार नाही.हा रस्ता केवळ अडीचशे ते तीनशे फूट आहे.मात्र वळसा घालून तो एक ते दीड कि.मी.पडत आहे.त्यामुळे अन्य रस्त्यावर काही कारण नसताना वळसा घालून रस्त्यावर गर्दी करण्याची गरज निर्माण होत आहे.त्यामुळे रस्त्यावर वाढीव अपघात होत आहे.त्यामुळे याकडे मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून त्यावर कार्यवाही करावी अशी मागणीची नगराध्यक्ष पाटील यांनी शेवटी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close