जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव पालिकेत आणखी एक गैरव्यवहार उघड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषद आरोग्य विभागातील ठेकेदारीवर काम करणारा संगणक कर्मचारी गत पंधरा दिवसापासून नगरपरिषदेतील रक्कम लंपास करून फरार झाला असताना आणखी एक आर्थिक गफला समोर आला असून सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने राष्ट्रध्वज खरेदीत आपला हात साफ केला असल्याचे वृत्त आहे मात्र हि बाब प्रमुख अधिकाऱ्यांचा वेळीच लक्षात आल्याने त्यांनी सुमारे ३९ हजार रुपयांची रक्कम भरून घेतल्याची खबर आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने संबंधित अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत खुलासा करताना म्हटले आहे की,”सदर रकमेचा भरणा रक्कम इंटरनेटच्या संपर्काअभावी भरणा दिसत नव्हती त्यामुळे लेखा विभागाच्या अहवालात ती त्रुटी दिसत होती मात्र तो कोणताही गैव्यवहार नाही केवळ तांत्रिक त्रुटींमुळे भरणा उशीरा झाला होता त्यामुळे नागरिकांनी गैरसमज करून घेऊन नये”असे म्हटले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेत डिसेंबर २०२१ पासून ‘प्रशासक राज’ सुरु आले आहे.तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा कालावधी डिसेंबर २०२१ मध्ये संपला आहे.त्यांच्या कालखंडात बऱ्यांपैकी प्रतिबंध झाला असल्याचे दिसून आले होते.त्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेत पदाधिकारी व नगरसेवक यांना ‘न भूतो’ असा ‘साग्रसंगीत’ निरोप देण्यात आला होता.त्यानंतर पालिकेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘प्रभारी राज’ आले होते.मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे नगराध्यक्ष यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला गेला होता.यामुळे शहरातील विविध विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक राहिला नसल्याचे उघड होत आहे.विविध विभागात बेदिली माजली आहे.कोणाचे कोणावर नियंत्रण राहिले नाही.त्यातून अनेक गैरप्रकार वाढीस लागले आहे.अशीच आरोग्य विभागातील घटना नुकतीच उघड झाली होती.त्यावर आमच्या प्रतिनिधीने प्रकाश झोत टाकला होता त्यानंतर हि दुसरी घटना उघड झाली आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावावा असं आवाहन लोकांना केलं होते.त्यामुळे यावर अनेक वाद झडले होते.त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने काही राष्ट्रध्वज एका व्यापाऱ्यांकडून ३९ हजारांची खरेदी केली होती.मात्र ते खरेदी केल्यावर संबंधित खरेदीदार व्यापाऱ्यास सदर बिल देणे गरजेचे होते.मात्र सदर बिलास पाय फुटले होते.व संबंधित व्यापाऱ्यास बिल दिले असे दाखवून सदर बिल कनिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या खिशात घातले होते.मात्र हि बाब काही दिवसात प्रमुख अधिकारी यांच्या काही हितेशी कर्मचाऱ्यांनी लक्षात आणून दिली होती.त्यावेळी ते सावध झाल्याने त्यांनी सदर रक्कम संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यास भरण्यास भाग पाडले होते.त्यामुळे त्यांच्या या सावधानतेचे कौतुक होत आहे.त्यामुळे हि कारवाई होणार हि त्यावर पांघरून घातले जाणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.आता यापुढे मुख्याधिकारी अन्य गफले शोधणार आहे का त्यांच्या या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close