जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगांव शहराला..इतक्या दिवसाआड पाणी मिळणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या तलावाची क्षमता वाढविणे गरजेचे असताना शहराला जलसंपदा विभागाकडून पाणी कमी मिळत असल्याचा जावई शोध लावून जनतेची दिशाभूल करून जनतेला वेड्यात काढून आपली राजकारणाची पोळी भाजून घेणाऱ्यांना आ.आशुतोष काळे यांनी उघडे पाडले असून १३१.२४ कोटींचा तलाव मंजूर केला आहे.आता गोदावरी नदी दुथडी भरून वहात असताना जिल्हा प्रशासनाने आता शहराला ३१ जुलै पासून चार दिवसाआड पाणी देण्याचे फर्मान काढले आहे.तर दुसरीकडे आ.काळे यांनी आपण हा कालावधी कमी केल्याचा दावा केला आहे.

वर्तमानात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असताना व धरणे ओसंडून वाहत असताना गोदावरी कालवे कोरडे ठाक होते.याबाबत कोणीही राजकीय नेता बोलायला तयार नव्हता मात्र राजेश मंटाला तुषार विध्वंस,संतोष गंगवाल आदींनी २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी पाठपुरावा केला तेंव्हा कुठे जलसंपदा विभागाला जाग आली आहे.आता कुठे गोदावरी कालवे वाहू लागले आहे.शहराला चार दिवसाड पाणी मिळणार आहे.

कोपरगाव शहरासाठी यापूर्वी चार साठवण तलाव असताना व जलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मंजूर असतानाही शहराला पाणी कमी आहे असा जावई शोध लावून त्यावर आपल्या राजकीय फायद्यासाठी बनाव उभा करणाऱ्या व ४२ कोटींच्या केंद्रीय पाणी योजनेची वासलात लावणाऱ्या व कारण नसताना निळवंडे धरणाच्या जलवाहिणीचे गाजर दाखविणाऱ्या नेत्यांना चाप लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरासाठी नवीन पाणी मंजुर केले होते.या शिवाय साठवण तलावाची उणीव दूर करण्यासाठी कोपरगाव शहरासाठी नूतन साठवण तलावासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याची निविदा नुकतीच जाहीर झाली असून सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले आहे सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.आता सदर कंपनीने पाच क्रमांकाच्या तलावातील पाणी उपसा करण्यास प्रारंभ केला आहे.
मात्र वर्तमानात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असताना व धरणे ओसंडून वाहत असताना गोदावरी कालवे कोरडे ठाक होते.याबाबत कोणीही राजकीय नेता बोलायला तयार नव्हता मात्र राजेश मंटाला तुषार विध्वंस,संतोष गंगवाल आदींनी २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी पाठपुरावा केला तेंव्हा कुठे जलसंपदा विभागाला जाग आली आहे.आता कुठे गोदावरी कालवे वाहू लागले आहे.आता कालवे आणि नदी वाहत असताना शहराला मात्र आठवड्यातुन एकदा पाणी मिळत होते.याबाबद वरील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी नुकताच आदेश देऊन आता शहराला निम्याने कालावधी करून चार दिवसाला पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याबाबत राजेश मंटाला,तुषार विध्वंस,संतोष गंगवाल आदींसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close