जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

माजी उपमुख्यमंत्री पवार यांचा..या ठिकाणी वाढदिवस साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार (दि.२२) रोजी कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम.महाविद्यालयात श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

राज्यात सर्वत्र पूर परिस्थिती असून कोरोनाची महामारी अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. पूर परिस्थितीमुळे शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव मध्ये अतिशय साध्या पद्धतीने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,प्राचार्य डॉ. रमेशजी सानप,मंदार पहाडे,संदीप पगारे,रमेश गवळी, कृष्णा आढाव,दिनकर खरे,मायादेवी खरे, राजेंद्र वाकचौरे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार,बाळासाहेब रुईकर,राजेंद्र खैरनार, आकाश डागा, राजेंद्र आभाळे, सोमनाथ आढाव, मनोज नरोडे,अनिरुद्ध काळे,विजय शिंदे,गणेश बोरुडे, किशोर डोखे, चांदभाई पठाण, तेजस साबळे, शुभम लासनकर,रितेश राऊत, संजय लोहारकर, आकाश गायकवाड,ऋतुराज काळे, प्रा.डॉ. निलेश भालपुरे, प्रा.डॉ. देविदास रणधीर,प्रा.मधुकर काळे, प्रा.डॉ. सुरेश काळे, रजिस्टार सुनील ठोंबरे, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी,सुरेश पवार, सागर कांबळे आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close