जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात नूतन पाणी योजनेचा कामाचा शुभारंभ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरासाठी पिण्याचे पाणी पुरविण्यात भविष्यात अहंम भूमिका निभावण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या ५ क्रमांक साठवण तलावाच्या १३१ कोटीच्या पाणी योजनेच्या प्राथमिक कामास आज संजयनगर येथे शुभारंभ झाला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनीं समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव शहर पाणी योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याची निविदा नुकतीच जाहीर झाली असून सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले आहे सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.राज्यातील नगर परिषद निवडणुका जाहीर होऊन राज्य सरकारने त्यास आरक्षणाच्या मुद्यावरून स्थिगिती दिली आहे.त्यामुळे सदर तलावाचे काम करण्यास संधी मिळाली आहे.

कोपरगाव शहरासाठी यापूर्वी चार साठवण तलाव असताना व जलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मंजूर असतानाही शहराला पाणी कमी आहे असा जावई शोध लावून त्यावर आपल्या राजकीय फायद्यासाठी कुभांड उभे करणाऱ्या व कारण नसताना निळवंडे धरणाच्या जलवाहिणीचे गाजर दाखविणाऱ्या नेत्यांना चाप लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरासाठी नवीन पाणी मंजुर केले होते.याशिवाय साठवण तलावाची उणीव दूर करण्यासाठी कोपरगाव शहरासाठी नूतन साठवण तलावासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याची निविदा नुकतीच जाहीर झाली असून सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले आहे सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.राज्यातील नगर परिषद निवडणुका जाहीर होऊन राज्य सरकारने त्यास आरक्षणाच्या मुद्यावरून स्थिगिती दिली आहे.त्यामुळे सदर तलावाचे काम करण्यास संधी मिळाली आहे.त्याची संधीत रूपांतर करण्याचा विडा आ.आशुतोष काळे यांनी उचलला आहे.त्यानुसार त्यांनी तलावाचे काम प्रथम सुरु करणे अभिप्रेत असताना आज अचानक संजयनगर या उपनगरातील उंच पाण्याची टाकीच्या कामाचा शुभारंभ केला आहे.

सदर प्रसंगी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,जावेद शेख,संदीप कपीले,इम्तियाज अत्तार,राजेंद्र आभाळे,हारुन शेख,सचिन गवारे,रहेमान कुरेशी,जलील अत्तार,मनोज शिंदे,राजु उशिरे आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close