जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावातील…या उपनगरासाठी पाण्याची टाकी मंजूर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या बेट व मोहनीराज भागाचा मागील काही वर्षापासुनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २ लाख १० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व पाईप लाईनसाठी देखील ८० लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी सेवा दल अध्यक्ष सचिन परदेशी यांनी दिली आहे.

बेट व मोहनीराज भागातील नागरिकांसाठी २ लाख १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसाठी ३९ लाख व जलशुद्धीकरण केंद्र ते बेट भागातील पाण्याच्या टाकीला जोडणाऱ्या २३४० मीटरच्या ६ इंच पाईपलाईनचा खर्च ४० लाख ३० हजार अशी एकूण ८० लाखाची हि योजना आहे.बेट व मोहनीराज भागाची सध्याची लोकसंख्या २९७१ आहे.पुढील ३० वर्षाच्या लोकसंख्येचा अंदाज घेतल्यास हि लोकसंख्या ३५०० होणार आहे.त्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

बेट व मोहनीराज भागाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची जुनी टाकी ५ लाख लिटर क्षमतेची असून देखील चुकीच्या बांधकाम पद्धतीमुळे साठवण क्षमता असून देखील हि पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नव्हती.त्यामुळे नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होण्यात अडचणी येत होत्या. यापूर्वी अस्तित्वात असलेलीं पाईपलाईन व्यवस्थित नसल्यामुळे व गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्यामुळे जुन्या टाकीला दिवसभर पंपिंग करून देखील हि पाण्याची टाकी पुर्णक्षमतेने भरत नव्हती व वीज बिलाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात होत होता.त्याची दखल घेवून आ. काळे यांनी दिलेल्या निधीतून नवीन पाण्याची टाकी व नवीन पाईप लाईन करण्यात आली आहे.

बेट व मोहनीराज भागातील नागरिकांसाठी २ लाख १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसाठी ३९ लाख व जलशुद्धीकरण केंद्र ते बेट भागातील पाण्याच्या टाकीला जोडणाऱ्या २३४० मीटरच्या ६ इंच पाईपलाईनचा खर्च ४० लाख ३० हजार अशी एकूण ८० लाखाची हि योजना आहे.बेट व मोहनीराज भागाची सध्याची लोकसंख्या २९७१ आहे.पुढील ३० वर्षाच्या लोकसंख्येचा अंदाज घेतल्यास हि लोकसंख्या ३५०० होणार आहे.त्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

दिवसातून दोन ते तीन वेळेस हि पाण्याची टाकी पूर्णक्षमतेने भरल्यास ४ ते ६ लाख लिटर पाणी उपलब्ध होऊन या भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.नवीन पाण्याची टाकी केवळ दोन ते तीन वेळेसच ठराविक कालावधीसाठी पंपिग करावी लागणार असल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेचा वीज बिलाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.नागरिकांना मुबलक पाणीसाठा होणार असल्यामुळे हि पाण्याची टाकी बेट व मोहनीराज भागातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असल्याचे शेवटी परदेशी यांनी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close