कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरात दूषित पाणी,तक्रार

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या खडकी या उपनगरात नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत असून त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत अनेक जण आजारी पडत असून विजेचा मोठ्या प्रमाणावर खेलखंडोबा होत असल्याची तक्रार कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका ताराबाई गणपत जपे आणि अन्य नागरिकांनी केल्या आहेत.

कोपरगाव प्रभाग क्रं.एक मध्ये गटार अपूर्ण असून ती तातडीने पूर्ण करावी,पथदिवे बसवून मिळावे,प्रभागातील मंजूर कामे तातडीने मार्गी लावावी.खडकी भागातील स्वच्छता गृहांची दुरावस्था झाली आहे ती दूर करावी”-दिपक जपे,कार्यकर्ते खडकी उपनगर.
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याची घेतलेली जबाबदारी कोट्यवधी रुपये खर्च करून पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करून पार पाडली असून नागरिकांना दर तीन दिवसाआड पाणी मिळणार आहे.भविष्यात दर दिवसा-आड किवा दररोज पाणी उपलब्ध होईल.अशी भीम गर्जना आ.आशुतोष काळे यांनी विधानसभा पूर्व केली होती. कोपरगाव शहरात आधी ४१ कोटींची पाणी योजना राबवून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले नाहीच पण आता पाच क्रमांकाचा साठवण तलाव निवडणूक पूर्व पूर्ण होऊनही अद्यापही नागरिकांना स्वच्छ आणि शुध्द पाणी हे दिवास्वप्न ठरताना दिसत आहे.विशेष म्हणजे आगामी कधीही कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक निवडणूक आयोग जाहीर करू शकतो अशा स्थितीत ही स्थिती आहे.कोपरगाव विधानसभा निवडणूक पूर्व साठवण तलाव पूर्ण झाला अशी माहिती मोठमोठे ढोल बडवून सांगितली गेली होती.अशीच घटना खडकी या उपनगरात आढळून आली आहे.
सदर ठिकाणी श्रमिक वर्ग मोठे प्रमाणावर असून त्या ठिकाणी त्यांना रोजंदारी केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे सकाळी वीज आणि पाणी असल्याशिवाय त्यांना घराबाहेर पडणे अशक्य असते अशा वेळी शुध्द पाणी आणि वीज त्यांना अत्यंत निकडीची आहे.मात्र त्यांना या दोन्ही प्रमुख घटकांपासून वंचित राहावे लागत आहे.याबाबत तेथील माजी नगरसेवक ताराबाई जपे यांनी आवाज उठवला आहे.त्यांनी नुकतीच कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन त्यांना दिले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”खडकी उपनगरात मोठे प्रमांवर श्रमिक वर्ग राहत असून त्यांना रोज आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर गेल्याशिवाय पर्याय नाही.मात्र पाणी आणि वीज न आली तर त्यांना कामावर जाणे कठीण बनत आहे.त्या प्रभागात गटार अपूर्ण असून ती तातडीने पूर्ण करावी,पथदिवे बसवून मिळावे,प्रभागातील मंजूर कामे तातडीने मार्गी लावावी.खडकी भागातील स्वच्छता गृहांची दुरावस्था झाली आहे.ती दूर करावी अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.
सदर निवेदनावर ताराबाई जपे,दिपक जपे,अमजद हशम शेख,राजू वाकळे,खंडू भुजंग वाघ,राजू शेख,पप्पू दिवेकर आदींच्या सह्या आहेत.