जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

विरोधकांना कावीळ,त्यामुळे विकास दिसत नाही-…यांचा आरोप

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील विरोधकांना कावीळ झाली असून त्यांना विकासकामे दिसण्याचे बंद झाले असून त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असून ती झाल्यावर नक्कीच मतदार संघातील विकास दिसेल अशी टिका आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.कोल्हे व त्यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.

  

‘कोपरगाव तालुक्यात व शहरात धान्य वितरणाबाबत कोणाला काही आक्षेपार्ह आढळल्यास आम्हाला त्वरित कळवावे आपण त्यांच्यावर कठोर कारवाई करू”- महेश सावंत,तहसीलदार,कोपरगाव.

  कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जगणे अवघड बनले असल्याचे दिसून येत आहे.गावठी कट्टे,तलवारीचे कारखाने खडकी उपनगरात आढळून आले आहे.तर सिनेस्टाईल गुन्हेगार एकमेकावर खुलेआम गोळीबार करताना दिसत आहे.त्यावरही सत्ताधारी आणि पोलिस गंभीर होताना दिसत नाही.उलट त्यावरून वर्तमानात मोठी चिखल फेक सुरू असल्याचे दिसून येत आहे.या महिन्याच्या प्रारंभी सोमवार दि.09 सप्टेंबर व त्या पाठोपाठ 19 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरासमोर एकमेकांविरुद्ध थेट गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली होती.त्यातील एक आरोपी रंगरेज हा गंभीर जखमी झाला होता.त्याने सामाजिक संकेतस्थळावर चलचित्र ण प्रसारित करून सत्ताधारी गटाचे आ.काळे यांचे स्वीय सहय्यक अरुण जोशी यांचे वर गंभीर आरोप केले होते.तर दुसऱ्या चलचित्रणात त्याने थेट आ.आशुतोष काळे यांचेवर हल्लाबोल केला होता.त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असून आज कोपरगाव तहसीलदार यांचे कार्यालयात संजय गांधी योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती.त्यावेळी आ.काळे यांनी हा आरोप केला आहे.

   त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”वर्तमानात पुरवठा विभागात जी अनागोंदी झाली आहे ती गंभीर असून त्याची दखल नवीन तहसीलदार यांनी घेणे आवश्यक ठरत असून या कामकाजात सुधारणा आवश्यक आहे.जे दोषी असतील त्यांच्यावर कोणतीही दयामया न दाखवता कारवाई करणे गरजेचे आहे.शहरात काही तरुण अवैध व्यवसायात आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईकरणे गरजेचे आहे.अनेक गुन्हेगार यात असून त्यांनी अनेकांनी आपली अवैध संपत्ती वाढवली आहे.त्यांना काही राजकीय लोकांचा आश्रय आहे.त्यामुळे त्यांनी हे उद्योग केले आहे.आता त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.विरोधक जे आरोप करत आहे.त्यांनी आपल्या डोळ्याची शस्रक्रिया करून घ्यावी तरच त्यानं विकासकामे दिसतील अन्यथा दिसणार नाही.पुरवठा विभागाबद्दल इतके नागरिक तक्रार करीत असतील त्यांना खोटे ठरवणे चुकीचे आहे.रेशन तक्रारी दूर करायला हव्या.तालुक्यातील शिवार रस्त्यांचार प्रश्न मार्गी लावावी,तालुक्यात विकासकामे झाली आहे.काही कामे निकृष्ट झाले असतील तर त्याची चौकशी सुरू असून त्यांना ते दुरुस्त करण्याचे आदेश आपण दिले आहे.त्यांना कुठलीही सुट दिली जाणार नाही.माजी आ.काळे यांनी आपल्या काळात तहसील कार्यालयाची इमारत उभारली.त्यांचे पाच वर्षात विरोधकांना फर्निचर करता आले नाही.ते आपण आपल्या कार्यकाळात केले आहे.न्यायालय,पोलिस ठाण्याची इमारत,पोलिस कॉलनी इमारत,ग्रामीण  रुग्णालय आदी कामे मोठ्या प्रमाणावर केली असल्याचे सांगितले आहे.

  

“रेशन कार्ड ऑनलाईन करण्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या असून त्याबाबत त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.पुरवठा विभाग नागरिकांना आर्थिक फायद्यासाठी लोकांना मोठा त्रास देत आहे”- नागरिक.

  सदर प्रसंगी तहसिलदार महेश सावंत यांनीसंजय गांधी योजनेत एकूण 393 प्रकरणे समोर ठेवली होती त्या पैकी 195 प्रकरणे मंजूर केली असल्याची माहिती दिली आहे.तर 200 प्रकरणे अद्याप बाकी असून त्यांच्याकडून काही कागदपत्रे अपूर्ण आहे.ती पूर्ण केल्यानंतर ती मंजूर केली जातील असे आश्वासन दिले आहे.त्यावेळी धान्य घोटाळ्याबाबत कारवाई करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले आहे.धान्य वितरणाबाबत कोणाला काही आक्षेपार्ह आढळल्यास आम्हाला कळवावे आपण कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.मात्र रेशन कार्ड ऑनलाईन करण्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या असून त्याबाबत त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.पुरवठा विभाग नागरिकांना आर्थिक फायद्यासाठी लोकांना मोठा त्रास देत असल्याने त्यातून सामान्य नागरिकांना सुटका करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close